Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असतो. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. मुलीसाठी लग्न हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. एका दिवसात तिचे संपूर्ण आयुष्य बदलते पण मुलीपेक्षाही हा क्षण तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण असतो. लहानाचे मोठे केलेल्या मुलीला लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी पाठविणे आई वडिलांसाठी खूप कठीण असते. याशिवाय लग्नाचा खर्च सुद्धा अनेकदा मुलींच्या कुटुंबातील लोकांना परवडणारा नसतो.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलीच्या लग्नासाठी तयार केलेला सुंदर मंडप पावसामुळे पडलेला दिसत आहे आणि प्रचंड मोठे नुकसान झालेले दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही दु:ख होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका लॉनमध्ये पावसामुळे भयंकर चिखल दिसून येत आहे. लग्नाचा मंडप पडलेला दिसत आहे. सामानाचे खूप नुकसान झालेले दिसत आहे. सगळीकडे नासधूस झालेली दिसत आहे.
हेही वाचा : भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात; नेमकं कुठे चुकलं तुम्हीच सांगा; थरारक VIDEO होतोय व्हायरल
या व्हिडीओवर लिहिलेय, “मुलीच्या लग्नासाठी सहा लाख कर्ज घेतले होते पण लग्न उद्या होतं आणि आज असे झाले” या व्हिडीओवरून तुम्हाला कळेल की लग्नाच्या आदल्या दिवशी झालेले हे नुकसान आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. असे कोणत्याही कुटुंबाबरोबर होऊ नये, असे तुम्हाला वाटेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
ashwinii_.15 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाप” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “घटना दुखद आहे, पण आपले पहिले लोक येडे नव्हते, आषाढ महिन्यात एक पण लग्न होत नव्हते.” तर एका युजरने लिहिलेय, “लग्न साधीपण होतात, उगीच जास्त खर्च करून कर्ज बाजारी होऊ नका, खूपच पैसा जास्त असेल तर मुला मुलींच्या अकाउंटवरती टाका जेणे करून त्यांना भविष्यात अडीअडचणीला कामी येतील बघा, यात माझा बोलण्यातून काही वाईट वाटले असेल तर माफी मागतो.”
आणखी एका युजरने लिहिलेय, “असू द्या टेन्शन नका घेऊ! एक तर पावसाळ्यात लग्न घ्यायचं नसतं! आणि घेतलं तर एवढा आरासार करायची गरज नव्हती! मला हे समजत नाही की हे लोक एवढा खर्च कशासाठी करतात. कोरोनात लग्न झाली नव्हती का?” एक युजर लिहितो, “सलाम त्या बापाला स्वतः तो आपला विचार न करता मुलांच्या भविष्याचा आणि त्याच्या पुढील आयुष्याचा विचार करत असतो.”
© IE Online Media Services (P) Ltd