हात नसलेल्या व्यक्तीचे वाहन चालवायचे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, “…ही आमच्यासाठी सन्मानाची बाब”

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे.

A man driving car without hands won Anand Mahindra's heart
महिंद्रा यांनी शेअर केलेला प्रेरणादायी व्हिडीओ ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. (Photo : Twitter)

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आनंद महिंद्रा यांच्या व्यावसायिक कौशल्याव्यतिरिक्त, लोक त्यांच्या विनोदबुद्धीचे चाहते आहेत. अशा परिस्थितीत, महिंद्रा यांनी शेअर केलेला प्रेरणादायी व्हिडीओ ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, जर या व्यक्तीने त्यांच्या कंपनीची कार चालवली तर ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब असेल.

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या व्यक्तीमुळे २०१६ मध्ये सरकारला मोटार वाहन कायद्यात सुधारणा करावी लागली आणि यानंतर अपंगांना परवाना देण्याची तरतूद जोडण्यात आली. विक्रम अग्निहोत्री असे या व्यक्तीचे नाव असून वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्यांना आपला हात गमवावा लागला होता. मात्र अशा अपघातानंतरही त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन आपला अभ्यास पूर्ण केला.

Google Doodle : दररोज ५ हजार बैठक आणि ३ हजार दंड! जाणून घ्या रुस्तम-ए-हिंद गामा पैलवानांविषयी

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

सुरुवातीला जेव्हा त्यांनी ड्रायव्हिंग शिकायचे ठरवले तेव्हा त्यांना कोणीही ड्रायव्हिंग शिकवायला तयार नव्हते. मात्र, स्वावलंबी विक्रमने कोणाच्याही मदतीशिवाय, ऑनलाइन व्हिडीओ पाहून ड्रायव्हिंग शिकली. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला उत्तर देताना विक्रमने त्यांचे आभार मानले आणि त्यांना आपला आयकॉन म्हटले आहे. सुरुवातीला विक्रमचा ड्रायव्हिंगचा परवाना अर्ज फेटाळण्यात आला. त्याचे अपील दाखल झाल्यानंतर कायद्यात काही बदल करण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A man driving without hands won anand mahindra heart said this is a matter of honor for us pvp

Next Story
Google Doodle : दररोज ५ हजार बैठक आणि ३ हजार दंड! जाणून घ्या रुस्तम-ए-हिंद गामा पैलवानांविषयी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी