मंगलाष्टक हे भारतीय विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा भाग असतो. लग्न समारंभात मंगलाष्टकातील श्लोकांचे पठण सहसा पुजारी किंवा भटजी करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मंगलाष्टकाची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये भटजीने असे मंगलाष्टक गायले आहे की ऐकून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.
हा व्हायरल व्हिडीओ एका मराठी विवाह सोहळ्यातील आहे. लग्नाच्या वेळी नवरदेव नवरी हातात अक्षता घेऊन एकमेकांसमोर उभे असतात. भटजी मंगलाष्टक म्हणताना व्हिडीओत दिसत आहे पण मंगलाष्टक ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.
भटजी म्हणतात, “लग्नाला आणला चांदीचा ग्लास.. लग्नाला आणला चांदीचा ग्लास; प्रसाद म्हणतो आज मानसी दिसते फर्स्ट क्लास…शुभ मुहूर्त सावधान.. शुभ मुहूर्त सावधान..” हे ऐकून लग्नातील सर्वच मंडळी जोरजोराने हसतात आणि नवरी नवरदेवाच्या डोक्यावर अक्षता टाकतात.
makeupartist_vishanka या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या भटजीवर संतापसुद्धा व्यक्त केला आहे.
एका युजरने लिहिलेय, “हे मुद्दाम केलेले वाटते. कोणतेही भटजी असं म्हणणार नाहीत” तर एका दुसऱ्या युजरने लिहिलेय, “भटजीने तर उखाणा घेतला” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खूप चुकीचं आहे.. ही आपली संस्कृती नाही