Premium

मगर आणि तरुणाचा थरारक सामना, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पोहणाऱ्या तरुणाचा आणि मगरीचा थरारक सामना बुधवारी पाहण्यास मिळाला.

youth and crocodile sangli
मगर आणि तरुणाचा थरारक सामना, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पोहणाऱ्या तरुणाचा आणि मगरीचा थरारक सामना बुधवारी पाहण्यास मिळाला. सुदैवाने पोहणारा तरुण जवळ येताच मगरीने तळ गाठल्याने बचावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Petrol-Diesel Price on 13 September: सर्वसामान्यांना दिलासा! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट, पाहा तुमच्या शहरातील दर

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी आता रुग्णाचे ‘जीओ टॅग’ छायाचित्र बंधनकारक, योजनेत ‘हे’ झाले बदल

नदीत पोहण्यासाठी तरुण रोज जात असतात. मात्र घाटाजवळ मोठमोठ्या मगरींचा अधिवास असल्याने पट्टीचे पोहणारे नेहमीच सावध असतात. आजही नित्याप्रमाणे राजदीप कांबळे सांगलीवाडीच्या बाजूने बायपास पुलाकडून समर्थ घाटाकडे येत होता. याचवेळी सांगलीवाडीकडून महाकाय मगर संथ विहार करीत मध्यभागी येत होती. दोघेही एकमेकाकडे येत असल्याचे काठावरील नागरिकांना दिसत होते. पोहणाऱ्याला ओरडून, शिट्ट्या वाजवून सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पात्रात त्याला ऐकायला गेले नाही. मगर व तरुण जवळ येताच थरारक दृष्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र डोळ्याचे पाते लवते न लवते एवढ्या काळात मगरीने डुबकी मारत तळ गाठला. तरुण काही घडलेच नाही असे समजून तीरावर आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A thrilling encounter between youth and crocodile in the krishna river basin of sangli ssb

First published on: 13-09-2023 at 12:44 IST
Next Story
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! एकट्या म्हशीने दिली सिंहाला टक्कर; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक