Viral Video : सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बायको सासूसमोरच नवऱ्याला चपलेने मारत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, घराच्या अंगणात बायको नवऱ्याला चपलेने मारत आहे. त्यानंतर ती हातात मोठी काठी घेते आणि काठीने नवऱ्याला मारते. यादरम्यान खाली बसलेली सासूबाई तिला थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसतेय आणि नवरा मात्र बायकोपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा भांडण; तरुणीने एका तरुणाला सटासट लगवाल्या कानाखाली, पाहतच राहिले प्रवासी.! पाहा धक्कादायक व्हिडीओ

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्या व्यक्तीविषयी सहानभूती व्यक्त केली आहे; तर काही युजर्सनी त्या महिलेने योग्य केले, असे लिहिले आहे. एका युजरने लिहिले, ‘नवरा तिला त्रास देतो म्हणून तिने मारले’. तर आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘मर्द हिंसा.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman beats husband with chappal in front of mother in law video goes viral ndj