नंदन निलकेणी (Nandan Nilekani) यांनी नुकतेच एका ट्विटद्वारे त्यांच्या चाहत्यांना एक माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले की ते व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत नाहीत. सोशल मीडियावर ही बातमी वाचून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असे खरेच घडू शकते का? नंदन निलेकणी व्हॉट्सअ‍ॅपशिवाय राहू शकतात का? असे प्रश्न लोकांना पडले आहे. नंदन निलकेणी यांनी नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण व्हॉट्सअ‍ॅप चालवत नसल्याची माहिती दिली आहे. यानंतर नंदन कोणते अ‍ॅप्लिकेशन वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदन निलकेणी यांनी जो फोटो शेअर केला आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांनी आपल्या मोबाईल फोनची स्क्रीन शेअर केली आहे, यात अनेक महत्त्वाचे अ‍ॅप्लिकेशन दिसत आहेत. परंतु यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, व्हॉट्सअ‍ॅप नाही, नोटिफिकेशनची सूचना नाही, फक्त आवश्यक अ‍ॅप्स. नंदन निलकेणी यांच्या होम स्क्रीननुसार, ते अ‍ॅपल टीव्ही आणि इंफोसिस लेक्ससारखे अ‍ॅप वापरतात. नंदनच्या फोनमध्ये भीम अ‍ॅप आहे, पण व्हॉट्सअ‍ॅप नाही.

सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून अनेकजणांनी ही पोस्ट लाइक केली आहे. काही लोक तर नंदन निलकेणी यांच्यासारखे स्वतःच्या फोनचे होम स्क्रीन शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card maker nandan nilekani do not use whatsapp pvp