कोणावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही, याचेच एक ताजे उदाहरण समोर आले आहे. खरं तर कोणत्याही मुक्या प्राण्याला किंवा असाह्य व्यक्तीला मदत करणं चांगल्या माणसाचं लक्षण माणलं जातं. असे अनेक लोक आहेत जे निस्वार्थपणे दुसऱ्यांची मदत करत असतात. पण सध्या एक अशी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बदकाच्या पिल्लांची मदत करत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुःखद घटना कॅलिफोर्नियात घडली आहे. येथील डाउनटाउन रॉकलिन शहरातील मधील स्टैनफोर्ड रेंच रोड आणि पार्क ड्राईव्ह येथे संध्याकाळी घडली. तिथे एक ४१ वर्षीय केसी रिवारा नावाची व्यक्ती आपल्या कारमधून जात असताना त्यांना रस्त्यावरुन जाणारी बदकाची पिल्ले दिसली. ती पिल्लं इतर गाड्यांखाली सापडू नये म्हणून रिवारा यांनी त्या बदकांना रस्ता ओंलाडण्यास मदत केली. पण याच वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला, बदकांच्या पिल्लांना रस्ता ओलांडण्यास मदत करणाऱ्या रिवारा यांना एका भरधाव कारने जोराची धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही पाहा- बाळाच्या पायाला उन्हाचे चटके लागू नये म्हणून आईने चक्क…, Viral फोटो पाहून तुमचेही डोळे पाणवतील

ही घटना जवळून पाहणाऱ्या एका १२ वर्षांच्या विल्यम विमसेट नावाच्या मुलाने सांगितले की, मी रिवारा यांचा दयाळूपणा जवळून पाहिला, उपस्थित असणारे अनेकजण त्यांच्या या कृत्याचे कौतुक करत होता. विमसेट पुढे म्हणाला, “ते कारमधून बाहेर पडले आणि बदकांचा पाठलाग करत होते यावेळी प्रत्येकजण टाळ्या वाजवत होता, कारण ते खरोखर चांगले काम करत होते, शिवाय गाड्यांसमोरुन धावणाऱ्या लहान बदकांना त्यांनी थांबवल आणि सुखरुप रस्त्याच्या पलिकडे नेलं, त्यांचे हे कृत्य पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. मात्र, त्या वेळी अचानक एक कार भरधाव वेगाने आली आणि रिवारा यांना धडकली ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या रिवारा यांचा मृत्यू त्यांच्या मुलांच्या डोळ्यांसमोर झाला.

हेही पाहा- महिना १६ लाख पगार, अर्जदार असावा केवळ १२ वी पास; तरीही कोणी करेना जॉब कारण…

या मुलाने पुढे सांगितले, कारने प्रत्यक्षात त्यांना धडक दिल्याचे मी पाहिले नाही, पण मला मोठा आवाज आल्याचं आठवतं आहे, कारच्या धडकेनंतर ते जोरात उडून रस्त्यावर पडले. त्यांच्या पायातील बूट आणि एक सॉक्स आमच्या कारच्या अगदी समोर पडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वृत्तवाहिनी KCRA नुसार ड्रायव्हर, एक 17 वर्षीय मुलगी असून अपघातानंतर ती घटनास्थळी थांबली होती. शिवाय या घटनेचा तपास सुरू असून ड्रायव्हर पोलिसांना चौकशीत मदत करत आहे.

या घटनेनंतर रिवारा कुटुंबासाठी निधी संकलनाची मोहीम सुरू करण्यात आलं आहे. शिवाय त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी केलेले काम कौतुकास्पद होतं. त्यांच्या जाण्यानंतर रिवारा कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून ही मोहीम सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर या अपघाताची घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidental death of father who went to help ducklings trending new in california jap