भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलीचा बाप बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका आटोपल्यानंतर अजिंक्यने आपली पत्नी राधिका आणि मुलीसोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यान अजिंक्यने आपल्या मुलीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अखेरीस अजिंक्यने आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलीचा गोंडस फोटो पोस्ट करत अजिंक्यने आपल्या सर्व चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिकाने आपल्या मुलीचं नाव आर्या असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही अजिंक्यच्या मुलीचं कौतुक केलंय. दरम्यान अजिंक्य सध्या आगामी बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करतो आहे.