प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. ३० जून रोजी त्यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता विवाहबंधनात अडकणार आहेत. मागच्या बरेच दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा होती. मात्र आता या लग्नाची पत्रिकाही तयार झाली आहे. ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे. आता अंबानींच्या घरचे लग्न म्हटल्यावर ही पत्रिका किती खास असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आकाशच्या लग्नपत्रिकेची चर्चा होती.
ही पत्रिका म्हणजे एक पांढऱ्या रंगाचा बॉक्स आहे. त्यावर अतिशय उत्तम असे नक्षीकाम केलेले असून त्याच्या आत केशरी रंगाचा आणखी एक बॉक्स आहे. त्यात गणपतीची लहानशी मूर्ती आहे. बॉक्सच्या आतमध्ये पत्रिका असून ती अतिशय आकर्षक असल्याचे आपल्याला या व्हिडियोमध्ये पाहता येईल. बॉक्सवर एस आणि ए हे श्लोका आणि आकाशच्या नावाची अद्याक्षरे सोनेरी रंगात कोरलेली आहेत.
श्लोका ही प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. आनंद आणि श्लोका हे दोघंही एकमेकांना शाळेपासूनच ओळखतात असंही म्हटलं जात आहे. आकाश आणि श्लोका या दोघांचीही कुटुंबे पाहता त्यांच्या लग्नाचा थाट अद्वितीय असणार यात शंकाच नाही. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर श्लोकाने प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायंसची निवड केली. २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोकाने ‘रोसी ब्ल्यू फाऊंडेशन’मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला. इकतच नव्हे, तर श्लोका ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची सहसंस्थापिकाही आहे. ही संस्था विविध एनजीओंची मदत करते.
