ट्विटरवर आनंद महिंद्राचे ८.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करून तो नियमितपणे त्याच्या फॉलोअर्सचं मनोरंजन करत असतात तर कधी माहितीपूर्ण पोस्ट टाकत असतात. त्यांनी केलेल्या  अलीकडील पोस्टमध्ये त्यांनी लोकांना पुन्हा जुन्या कळात घेऊन गेले आहेत. त्यांनी मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलची ही जुनी जाहिरात पोस्ट करत त्याला मजेशीर कॅप्शन दिलेलं आहे.

काय होती पोस्ट?

“तर महागाईवर मात करण्याचा हा एक मार्ग आहे. टाइम मशीनमध्ये जा आणि पाठी जा … परत जा. ताज, मुंबईसाठी प्रति रात्र ६ रुपये? ते काय दिवस होते. ”आनंद महिंद्रा यांनी या विनोदी कॅप्शनसह जुन्या जाहिरातीची एक फोटो शेअर केला. या जाहिरातीच्या फोटोवर दिसत आहे त्यानुसार ही जाहिरात १ डिसेंबर १९०३ रोजीची आहे.  ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये राहण्यासाठी तेव्हा निव्वळ ६ रुपये लागत होते, हे जाहिरातीमधून दिसून येत.

लोकांच्या प्रतिकिया

दोन दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर केल्यापासून, पोस्टला ८ हजारपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. तर काहींनी ही पोस्ट रीपोस्ट केली आहे. अनेकांनी यावर आवर्जून कमेंट केली आहे. एक युजर कमेंट करतो,  “हा हा! तुमच्या पॅक असलेल्या शेड्युल आणि वचनबद्धतेमध्येही तुम्ही खूप छान विनोदी पोस्ट करत आहात !! खरोखर उत्कृष्ट आणि प्रेमळ शुभेच्छा सर !! ” दुसरा युजर म्हणतो की, “कदाचित भावी पिढ्या सध्याच्या किंमतींचा तशाच प्रकारे विचार करतील.” या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या आज्जी आजोबांच्या आठवणीही कमेंट केल्या आहेत. तर काहींनी सर आताची परस्थिती कशी सुधारणार अशीही कमेंट केली आहे. तर एक युजर म्हणतो की, “टाइम मशीनने मागे जाता आलं तर मी ताज मध्ये राहण्यापेक्षा जागा विकत घेईल. त्या वेळी जागेचा भाव १५ पैसे पर यार्ड होता. ६ रुपयांप्रमाणे ५ दिवस राहण्यासाठी ३० रुपये गेले असते. त्यापेक्षा त्या पैशातून मी जागा घेतली असती. कारण आज मध्य मुंबईत जागेचा भाव करोडोमध्ये आहे.”

आनंद महिंद्रा यांनी  शेअर केलेल्या पोस्टवर तुमचे काय मत आहे?