महिंद्रा समुहाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. शिवाय तुम्हीही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुम्ही त्यांचे ट्विट पाहिले असतीलच. महिंद्रा हे सतत नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलत असतात. शिवाय तरुणांना फायद्याच्या ठरतील अशा कल्पना ते आपल्या ट्विटच्या माध्यमातून शेअर करत असतात. देशात आणि जगात कुठेही चांगल्या गोष्टी घडत असतील त्याची दखल घेत त्या इतरांपर्यत पोहचवण्याचं कामही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. त्यामुळे महिंद्रा यांच्या ट्विटची अनेकजण वाट पाहत असतात. त्यातही सर्वात जास्त वाट बघितली जाते ती त्यांच्या मंडे मोटीव्हेशनची, कारण ते प्रत्येक सोमवारी काहीतरी प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असाच एक व्हिडीओ त्यांनी आज शेअर केला आहे. ज्यामध्ये एक घोडा पाण्यात पळताना दिसत आहे. ११ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तो पाण्यावरुन कसा सहज धावतो हे तुम्ही पाहू शकता. आपल्या सर्वांना माहित आहे की पाण्यात धावणे सोपं नाही. कारण जेव्हा जेव्हा आपण पाण्यात धावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण थकून जातो. पण हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या फॉलोवर्सना संदेश दिला आहे. तो म्हणजे तुमचा स्वतःवर असेल तर तुम्ही असाध्य ते साध्य करु शकता.

हेही पाहा- हेल्मेट नाही म्हणून तरुणाने ऐनवेळी केला भन्नाट देशी जुगाड; Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “तुम्ही पाण्यावरही चालू शकता पण त्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हा सगळा मनाचा खेळ आहे. तुमच्या आठवड्याची सुरुवात स्वतःवर आणि तुमच्या आकांक्षांवर विश्वास ठेवून करा.” आनंद महिंद्रा यांनी आज दुपारी शेअर केलेला व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सुमारे ९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

दरम्यान, नेहमीप्रमाणे त्यांच्या ट्विटखाली अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, ‘अगदी बरोबर बोलला सर! सर्वकाही आपल्या मनाचा खेळ आहे.’ तर आणखी एकाने खरंच हा खूप प्रेरणादायी व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने विनोदी कमेंट केली आहे, त्याने लिहिलं आहे की, ‘मी हे ट्राय केलं पण तासाभराने मी हॉस्पिटलमध्ये होतो.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra tweeted a video of monday motivation and gave a valuable message to his followers jap