Ashadi Ekadashi 2025 wishes: हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत-वैकल्यांनाही पवित्र मानले जाते, ज्यामध्ये एकादशी, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते; तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात. परंतु ,या २४ एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते, ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’, असेदेखील म्हटले जाते. यंदा एकादशीनिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून, त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
१) अवघा रंग एक झाला
विठू माझा अबीर-गुलालात न्हाला,
सारे वारकरी जमले पंढरी
बोला पांडुरंग हरी!
२) तूच माझी आई देवा, तूच माझा बाप अन् सखा,
तूच जगाचा वाली, तूच साऱ्यांचा पाठीराखा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
३) टाळ वाजे, मृदृंग वाजे
वाजे विठूच्या वीणा,
वारकरी आले पुंढरपुरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा..!
४)नको श्रीमंतीची आस देवा
नसावा सौंदर्याचा मोह,
चरणांचा असो ध्यास देवा
असावी भक्तीची मज आस!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
५) विठू तुझ्या गजरात तल्लीन व्हावे
सावळ्या तुझ्या रंगाला डोळे भरूनी पहावे,
प्रत्येक श्वासात विठ्ठला तुझे नाव असावे
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणावे!
६) जय हरी जय हरीचा नाद दुमदुमला
पंढरीत जणू स्वर्ग अवतरला,
विठूला पाहून आनंद गवसला
वारकऱ्यातही सावळा दिसला!
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!