बटाटा आणि वजन घटवणं याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. बटाटा किंवा बटाट्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे उलट वजन वाढतं तेव्हा अनेकदा काहीजण आपल्या डाएटमधून बटाट्याला पूर्णपणे वगळतात. आता याच बटाट्यामुळे एखाद्याचे वजन कमी झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाही ना? पण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अँड्र्यु टेलरनं बटाट्यामुळे आपलं वजन घटल्याचा दावा केला आहे.
गेल्यावर्षभरापासून अँड्र्यु फक्त बटाटेच खात आहे आणि बटाट्यांमुळे आपलं ५० किलो वजन कमी झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. आपण डॉक्टरचा सल्ला घेऊनच आहारात बटाट्यांचा समावेश केल्याचं अँड्र्यु सांगतात. पण, तरीही इतरांनी मात्र आपल्यासारखा प्रयोग न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. बटाट्यामध्ये शरीरास आवश्यक अशी पोषणमुल्य खूप कमी प्रमाणात आहेत, तेव्हा आपण यापासून विविध पाककृती तयार करून ती खात असल्याचं अँड्रयुने सांगितलं.
वाचा : फेसबुकवर चुकूनही ‘कमल का फूल हमारी भूल’ टाईप करू नका, अन्यथा…