मोहम्मद अनस नावच्या  युजरचं अकाऊंट फेसबुककडून ३० दिवस बंद करण्यात आलं आहे. त्याने ‘कमल का फूल हमारी भूल’ असं स्टेटस फेसबुकवर अपलोड केलं होतं. पण त्यानंतर काहीच वेळात त्याचं अकाऊंट फेसबुककडून बंद करण्यात आलं.

वाचा : गायींवरील पराकोटीच्या प्रेमापोटी त्याने घरदार सोडलं!

मोहम्मदने फेसबुकवर एका कॅश मेमोचा फोटो शेअर केला होता. या कॅश मेमोच्या तळाला ‘कमल का फूल हमारी भूल’ असं लिहिले होते. हा फोटो शेअर करताना त्याने एक ओळ लिहिली होती.  ‘वरील ओळ आपल्या कॅश मेमोवर प्रिंट करून व्यापाऱ्यांनी जनतेला त्यांची चूक दाखवून दिली. भाजपला निवडून देणं ही जनतेने केलेली मोठी चूक असल्याचं कदाचित व्यापाऱ्यांना या पोस्टमार्फत दाखवून द्यायचं असेल’ असं मोहम्मदने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. ही पोस्ट अपलोड केल्यानंतर ३० दिवसांसाठी मोहम्मदचं अकाऊंट बंद करण्यात आलं असल्याचं ‘इंडिया टुडे’ने म्हटलं आहे.

पाहा !१९ वर्षांपूर्वी ‘गुगल’ कसं होतं

यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याने फक्त फोटो अपलोड केला, यात त्यांनी स्वत:चं मत मांडलंच नाही किंवा या पोस्टमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नव्हते अशा अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहेत.