Unique Baby Born: राजस्थानच्या दौसा या भागातून एक थक्क करणारी घटना सध्या समोर येत आहे. दौसा येथील हॉस्पिटल मध्ये एका महिलेने गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला होता. या बाळाला पाहून डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलचा स्टाफ सगळेच थक्क झाले होते. याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील अनेकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली पण अवघ्या २० मिनिटात या नवजात बाळाच्या कुटुंबावर काळाने घाला घातला.
प्राप्त माहितीनुसार अलवर येथे राहणारी एक महिला हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. रात्री ९.३० च्या सुमारास तिच्या प्रसव वेदना वाढू लागल्या. काहीच वेळात बाळाचा अगदी सुरक्षित जन्म झाला पण मग या बाळाला पाहताच तिथे उपस्थित प्रत्येकजण थक्क झाला. या बाळाच्या नाकाच्या जागी गणपतीच्या चेहऱ्याप्रमाणे सोंड होती तर कान सुद्धा अगदी गळ्यापर्यंत मोठे होते. हॉस्पिटलच्या स्टाफमध्ये सुरु असलेल्या चर्चेमुळे काहीच वेळात बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरली. थोडं सावरल्यावर बाळाला डॉक्टरांनी लगेच त्यांच्या आईचं शेजारी झोपवलं पण १५ ते २० मिनिटातच बाळाचा श्वास अचानक बंद झाला.
गणपतीच्या चेहऱ्याच्या बाळाचा जन्म
हे ही वाचा<< सीमा हैदर व सचिनला मिळाली नोकरीची ऑफर; महिन्याचा पगार वाचून नातेवाईकही थक्क
दौसा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शिवराम मीणा यांनी या घटनेची माहिती देताना सदर प्रकार हा जेनेटिक किंवा क्रोमोसोम्सच्या गुंतागुंतीमुळे झाल्याची शक्यता वर्तवली आहे. बाळाच्या निधनानंतर डॉक्टर मीणा यांनी यावर भाष्य करता गर्भवती महिलांनी ठराविक काळानंतर नियमित अल्ट्रासाउंड व सोनोग्राफी करत राहणे आवश्यक आहे असेही सांगितले. गरीब व गरजू महिलांसाठी अंगणवाडी केंद्रांवर अशाप्रकारच्या सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध असायला हव्यात वज्यामुळे अशी स्थिती आधीच ओळखून त्यावर उपाय करण्यात मदत होऊ शकते.