Shocking video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार आता पुन्हा एकदा समोर आला आहे. बेंगळुरूच्या टेक सिटीमधील कोडीगेहल्ली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका मॉलमध्ये घडलेल्या एका घृणास्पद घटनेत, एका पुरूषाला चेंजिंग रूममध्ये महिलांचे व्हिडिओ काढताना रंगेहाथ पकडण्यात आले. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे मॉलमध्ये जाताना शंभर वेळा विचार कराल.
स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये संतप्त महिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत ज्यांनी चित्रीकरण करताना त्या पुरूषाला पकडले. महिलांनी असा दावा केला की, त्या पुरूषाने त्यांचा विनयभंग केला, त्यांना ढकलले आणि पळून जाण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला आणि बाहेर पळून गेला. मात्र इमारतीबाहेर उपस्थित असलेल्या ऑटो चालकांनी त्या पुरूषाला पकडले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने नेटिझन्स त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.व्हायरल झालेल्या ट्विटवर बेंगळुरू पोलिसांनी शहरातील अधिकाऱ्यांना टॅग करून प्रतिसाद दिला. त्यात कोडीगेहल्ली पोलिस स्टेशनचे अधिकृत एक्स हँडल आणि शहरातील एसीपी आणि डीसीपी यांचे अधिकृत अकाउंट टॅग केले गेले.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Ilyas_SK_31 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. तर एका वापरकर्त्याने लिहिले की, “अशा व्यक्तीला खूप कठोर शिक्षा हवी आहे. हे निर्लज्ज लोक आहेत जे समाजाला जातीय आधारावर विभागण्याचा आणि सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.” अनेक लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. कोणी या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवंय, असं लिहिलंय. तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा असं म्हंटलंय.