Viral video: सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. देशात बहुतांश भागातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे उष्णतेचा अनेकांना त्रास होतो. तुमच्या शरीरातील तापमानही वाढायला लागतं आणि शरीर डिहायड्रेट व्हायला लागतं. यामुळे जीवाला गारवा मिळावा म्हणून थंडगार पाणी पितात आणि काही लोकं तर भरपूर आईस्क्रीम खातात. तसेच अनेकांना कोल्डड्रिंक्स प्यायला आवडतं. मात्र सध्या जो व्हिडीओ समोर आलाय तो पाहून तुम्ही यापुढे आईस्क्रिम खाताना शंभर वेळा विचार कराल.
रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना फेरीवाल्याकडचे आईस्क्रीम खाण्याची सवय असते. काही वेळा फेरीवाल्यांकडून असे आईस्क्रीम बनवताना निष्काळजीपणा दाखवला जातो. जो ग्राहकाच्या जीवावर बेतू शकतो. असाच एक धक्कादायत प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका तरुणाला आईस्क्रिममध्ये चक्क ब्लेड सापडलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपल्या मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हॅनिला आईस्क्रीम खाताना शंभर वेळा विचार कराल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणाला आईस्क्रीम खाताना त्यामध्ये ब्लेड सापडलं आहे. आईस्क्रीम खात असताना तोंडामध्ये रेझर ब्लेड असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी काहीतरी टोचत असल्याचे त्याला जाणवले. त्यानंतर ती त्यानं वस्तू तोंडातून बाहेर काढली त्यावेळी त्याला धक्काच बसला. कारण टोचणारी ती वस्तू ब्लेड होती. सुदैवाने तो ब्लेड तरुणाच्या अन्ननलिकेत गेला नाही. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे लोकांच्या जीवाशी कसा खेळ सुरु आहे हे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ khabar_diary नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “आता काय जीवच घेणार का” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर एकानं केली आहे. तर अशाप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणं गंभीर असल्याचंही लोकांनी म्हंटलंय.