सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. वेगवेगळे स्टंट, डान्स, हरकती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. त्यामुळे काही जणांना प्रसिद्धीचं व्यसन लागतं. यासाठी काहीही करण्यास तयार असतात. असाच एक व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल होत आहे. प्रवासादरम्यात आपण स्वत: किंवा कुटुंबियांचं तिकीट काढतो आणि प्रवास करतो. मात्र एका युट्यूबरनं संपूर्ण मेट्रो बूक करत आपल्या मित्रांसोबत प्रवसात पार्टी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमित नावाच्या तरुणाने जयपूर मेट्रोची एक पूर्ण ट्रेन बूक केली, असा दावा केला आहे. या व्हिडीओत मेट्रोतील संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत काय आहे?
रात्री १० वाजता ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर अमित त्याच्या मित्रांसोबत ट्रेनमध्ये बसला. त्यानंतर हा प्रवास सुरू झाला. व्हिडिओमध्ये अमितने संपूर्ण ट्रेनमध्ये फिरून रिकामी ट्रेन दाखवली आहे. ट्रेन न थांबता पुढे जाते. यानंतर ट्रेनमध्ये मस्ती सुरू होते. अमित मित्रांसोबत जमिनीवर बसतो आणि ते एक गेम खेळू लागतात. त्यानंतर मेट्रो ठिकाणी थांबते जिथे सर्वजण टॉयलेटसाटी खाली उतरतात. ट्रेनमध्ये चढताना या लोकांना बंद डब्यात जेवणही दिले जाते आणि ते जमिनीवर बसून जेवतात आणि विश्रांती घेतात.

मेट्रो प्रवासाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच नक्कीच प्रवास केला की एडिटींग करून व्हिडीओ बनवलाय असाही प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र असं असलं तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Booking the entire metro and party with friends rmt