viral video : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. यामध्ये प्राण्यांचेही काही व्हिडीओ असतात.प्राण्यांमधील मारामारी तर कधी त्यांच्यातील प्रेम असे व्हिडीओ आपण पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही लोकांना सरप्राईजही देतात. या प्राण्याच्या कित्येक सवयी हुबेहुब माणसांसारख्याच असतात. प्राण्यांना माणसांचे शब्द समजू शकत नसले तरी मानव त्यांना अशा प्रकारे प्रशिक्षित करतो की प्राण्यांना त्यांचे म्हणणे सर्व समजते.

या प्रशिक्षणाचे एक अनोखे उदाहरण तुम्हाला एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ज्यामध्ये एक चिंपांझी माणसांसारखे वागताना पिझ्झा डिलिव्हरीसाठी ऑर्डर घेतो आणि नंतर त्याचे पैसेही देतो. हा व्हिडीओ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आला आहे हे यावरून स्पष्ट होते, पण असे असले तरी पिझ्झासाठी पैसे देणाऱ्या चिंपांझीचे प्रशिक्षण आणि कृती वाखागण्याजोगी आहे.

डिलिव्हरी बॉयने मागे न बघता ठोकली धूम!

अलीकडेच @OTerrifying या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिंपांझी पिझ्झाची ऑर्डर घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पिझ्झा डिलिव्हरी करणारा माणूस घराबाहेर पोहोचतो आणि दरवाजा ठोठावतो. तेव्हाच एक चिंपांझी आतून बाहेर येतो. डिलिव्हरी बॉय त्याला पाहून आश्चर्यचकित होतो. घाबरत घाबरत डिलिव्हरी बॉयने पैसे घेतले आणि पिझ्झाचा बॉक्स त्याला दिला. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तिथून लगेच धुम ठोकली. हा व्हिडीओ रशियामधील असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कोल्हापुरात भर रस्त्यात गाढवाचा वृद्धावर हल्ला, पायाला चावा घेतल्यानं वृद्ध गंभीर जखमी, घटनेचे CCTV Footage Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओला जवळपास ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने गंमत केली की घराचा मालक कुठे आहे, तो प्राणीसंग्रहालयात बंद आहे का?