Chinese company Distributing Bonus Viral Video : एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची योग्यती काळजी घेत असल्याची उदाहरणे कमीच पाहायला मिळतात. मात्र चीनमधील एका कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांना अनोखं गिफ्ट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी वापरलेली अनोखी पद्धत जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेनान माइन क्रेन (Henan Mine Crane Co Ltd) या कंपनीने एका ७० मीटर लांबीच्या टेबलावर ६० दशलक्ष युआन (७० कोटी रूपयांहून अधिक) अंथरले आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना १५ मिनिटांच्या कालावधीत ते मोजू शकतील तेवढे पैसे बोनस म्हणून घेऊन जाण्यास सांगीतले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी मोजली तेवढी रक्कम त्या कर्मचार्‍यांना बोनस म्हणून देण्यात आली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यामध्ये एका टेबलावर पैशाचा ढीग लावल्याचे दिसून येत आहे. तर कर्मचारी आपापल्या घरी घेऊन जाण्यासाठी वेगाने पैसै मोजताना दिसत आहेत. worldofbuzz.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या कंपनीतील कर्मचार्‍यांची ३० जणांच्या गटात विभागणी करण्यात आली होती. ज्यामध्ये प्रत्येक गटाला दोन जणांची निवड करायची होती जे दुसर्‍या गटाने गोळा केलेले पैसे वेगाने मोजतील. यामध्ये काही कर्मचार्‍यांनी १००,००० युआन (१२ लाख रूपयांहून जास्त) इतकी रक्कम बोनस म्हणून मिळवली.

बोनस का देण्यात आला?

चीनी कंपनीचे अध्यक्ष सन यांनी या दिलेल्या बोनसबद्दल माहिती देताना सांगितले की, “कंपनीने यंदा १२८,००० हून अधिक क्रेनची विक्री केली, ज्यामधून २६० दशलक्ष युआन (जवळपास आरएम१६० दशलक्ष) इतका नफा कमवला. पण वर्षाच्या अखेरीस १०० दशलक्ष (जवळपास आरएम६० दशलक्ष) बोनस देण्यासाठी कुठलाही दबाव नव्हता”.

या व्हिडीओला लाखो व्ह्यूव्ज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कितीतरी जण ते काम करत असलेल्या कंपनीची तुलना या कर्मचाऱ्यांना पैसे वाटणाऱ्या कंपनीबरोबर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese company gives employees 15 minutes to grab bonus from rs 70 crore on table as much as they can count video goes viral rak