Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो याचा अंदाज हा व्हायरल व्हिडीओ पाहून लावता येतो. आजच्या जगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. मात्र, प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. त्यासाठी प्रयत्न करूनही अनेकजण कंटाळतात. मात्र, जे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांना नक्कीच यश मिळते. खेळात कोणीतरी जिंकतं तर कोणी पराभूत होतं. हार जीत हा खेळाचा भागच आहे. मात्र, शेवटपर्यंत जो संयम ठेवून प्रयत्न करतो तो जिंकतोच. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावण्याच्या स्पर्धेत एक स्पर्धक सर्वांच्या मागे राहिला होता मात्र नंतर असं काही घडलं ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

हरलेला डावही जिंकला येतो याचं एक उदाहरण या व्हिडीओतून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लहान मुलांची धावण्याची स्पर्धा सुरु आहे. यावेळी सर्व खेळाडू स्पर्धेत जोशात धावताना दिसत आहेत. दरम्यान या स्पर्धेत सर्वात शेवटचा खेळाडू स्पर्धेत टिकण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या सोबतचे सर्व खेळाडू पुढे निघून गेल्यावर तो सुद्धा जिवाच्या आकांताने धावताना दिसत आहे. प्रेक्षकांबरोबर सगळ्यांना वाटत होतं की हा शेवटचा खेळाडू आता हरणार मात्र त्यानं जिद्द सोडली नाही. शेवटच्या क्षणी तो असा काही धावला की, पहिल्या ३ स्पर्धाकांच्या रांगेत शेवटचा खेळाडूही दिसू लागला. त्यानंतर बघता बघता त्यानं स्पर्धा जिंकलाही.

हा व्हिडीओ शेअर करताना, “यश मिळत नाही म्हणून अर्ध्यात डाव सोडणाऱ्यांसाठी खूप छान असा हा व्हिडिओ हरेल असं वाटतं असताना ना सुद्धा माणूस शेवटच्या क्षणी जिंकू शकतो फक्त जिद्द संयम चिकाटी आणि साहस सोबत ठेवलं पाहिजे याच छान उदाहरण” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् अवकाळीचा फटका; पीक पाहून शेतकरी ढसाढसा रडला

हा व्हिडीओ chipku_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला हजारो व्हूज मिळाले आहेत. तसेच नेटकरी यावर प्रतिक्रियाही देत आहेत.