पार्टी आणि कार्यक्रमात आपणही कित्येकदा डान्स केला असेल. तर आपल्या डान्सचे आपण अनेकांना प्रभावित सुद्धा केलं असेल. सोशल मीडियावर अशा डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी विचित्र डान्सही व्हायरल होत असतात. पण सध्या एका कपलने पहिल्या पावसात चक्क रस्त्याच्या मधोमधो भन्नाट डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळीकडे या कपलचा डान्सचा व्हिडिओ फिरताना दिसतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसाने लोकांचे चेहरे फुलले आहेत. दरम्यान इंदूरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जोडपे पावसात रस्त्याच्या मधोमध नाचत आहे. हा व्हिडिओ इंदूरच्या भंवर कुआं भागातील आहे. या कपलचा डान्स बघून नेटकरीही खूश झाले आहेत. या कपलनं पहिल्या पावसाचा पुरेपुर आनंद घेत बेधुंद होत डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “भर पावसात जो छत्री शेअर करतो तोच खरा मित्र”, दोन पोलीस मित्रांचा Video होतोय तुफान व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे पाहून काहींना हे चित्रपटाचं शूटींग सुरु असल्याचं वाटत आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज गेले असून नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple rain dance in indore the middle of the road viral video on social media srk