शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बरेचजण घरापासून लांब वेगळ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात वास्तव्यास जातात. यावेळी त्यांना सगळ्यात जास्त आठवण येत असेल ते घरच्या जेवणाची. कारण आपण जगात कुठेही गेलो, कुठल्याही महागड्या हॉटेलमध्ये जेवण केले तरी घरच्या जेवणाची चव कशालाच येऊ शकत नाही. ही गोष्ट आपण सगळेच मान्य करू, पण ज्यांना घराबाहेर राहणाऱ्यांची परिस्थिती माहित नसेल त्यांच्यासाठी सध्या व्हायरल होणारा एक फोटो या गोष्टीचा पुरावा देईल असा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणारा हा फोटो एका वडिलांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे, ज्यांची मुलगी हॉस्टेलमधून ५ महिन्यांनंतर घरी येणार आहे. त्यांच्या मुलीने इतक्या दिवसांनंतर घरी येत असल्यामुळे वडिलांकडे एक मागणी केली आहे. खाणावळीतील जेवण जेऊन थकलेल्या या मुलीने घरी आल्यानंतर तिला कोणते खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा आहे याची यादीच वडिलांना पाठवली आहे, पाहा व्हायरल होणारा हा फोटो.

आणखी वाचा: CCTV: साखळीचोरांना तिने चांगलीच अद्दल घडवली! बाइकवरून खाली पाडले अन्…; पाहा Viral Video

व्हायरल होणारा फोटो:

या फोटोमध्ये मुलीने खाद्यपदार्थांची मोठी यादी दिलेली दिसत आहे, यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या भन्नाट प्रतिक्रिया पाहा.

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आणखी वाचा: Video: गाणी ऐकत विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या मुलाला ट्रॅफिक पोलिसाने पकडले अन्…; पुढे काय झाले एकदा पाहाच

नेटकऱ्यांनाही मागणी पटली असून, हा फोटो आता घरापासून लांब राहणाऱ्या सर्वांची व्यथा मांडणारा ठरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter returns home after 5 months from hostel see what she demands from her father netizens said can relate to it pns