प्रचंड भूक लागली असेल तर कधीकधी आपण पटकन जेवण ऑर्डर करतो. त्या जेवणाची डिलीवरी कधी मिळेल याची वाट बघत आपण भुकेने व्याकुळ असताना जर डिलीवरी मिळणार नाही असा मेसेज तुम्हाला आला तर? त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? यावर कोणालाही नक्कीच राग अनावर होईल. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीबरोबर घडला आहे, ज्याचा स्क्रीनशॉट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं काय घडल जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवर शेअर करण्यात आलेला एक स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. Bodybagnall या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये डिलिवरी बॉय बरोबर केलेले चॅट दिसत आहेत. या फोटोमध्ये दिसत आहे डिलीवरी बॉयने ‘सॉरी’ असा मेसेज केला आहे, त्यावर ‘काय झाले’ असे विचारताच त्याने ‘ऑर्डर केलेले जेवण खूप चविष्ट होते म्हणून मी ते खाऊन टाकले, तुम्ही Deliveroo कंपनीला याबाबत तक्रार करू शकता’, असा रिप्लाय केला आहे. त्यावर ऑर्डर दिलेल्या व्यक्तीने ‘तू खूप वाईट माणूस आहेस’ असा मेसेज केला. त्यावर डिलीवरी बॉयने ‘मला फरक पडत नाही’ असा रिप्लाय दिला आहे. पाहा व्हायरल होणारा हा स्क्रिनशॉट.

व्हायरल होणारा स्क्रिनशॉट :

हा स्क्रिनशॉट पाहून नेटकरीही अचंबित झाले असून काही जणांनी त्यांनाही या डिलीवरी कंपनीकडुन हा अनुभव आल्याचे कमेंट्समध्ये सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delivery boy eats customers ordered food latter says sorry i dont care on message screenshot goes viral pns