आई-वडील नेहमी मुलांच्या भल्याचाच विचार करतात. आपल्या मुलाने किंवा मुलीने प्रगती करावी, प्रत्येक कामात यशस्वी व्हावे यासाठी ते नेहमी सल्ले देत असतात. पण कधीकधी या सल्यांचे स्वरूप उपहासात्मक असते. असे उपहासात्मक सल्ले किंवा कोणत्यातरी विशिष्ट गोष्टीवरून टोमणा तुम्हीही ऐकला असेल. स्वच्छतेवरून, खाण्यावरून असे अनेक सल्ले दररोज त्यांच्याकडुन दिले जातात, आपल्या पालकांच्या या विनोदबुद्धीवर तुम्हालाही हसू अनावर झाले असेल. याच्याशीच निगडित एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका व्यक्तीने त्याच्या मुलीला टोमणा मारलेला दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणारा हा फोटो ‘मोमो’ (डिंपल गर्ल) या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या ट्वीटमधील फोटोमध्ये या मुलीने तिच्या वडिलांनी केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात ब्लड रिपोर्ट्स आणल्याबद्दल सांगताना त्यांनी, ‘तुझे आणि तुझ्या मैत्रीणीचे ब्लड रिपोर्ट्स आणले, तिथेसुद्धा तुझी मैत्रीण ‘ए पॉजिटीव्ह’ आहे आणि तू ‘बी निगेटीव्ह’ , असे लिहले आहे. याचा अर्थ हा की ब्लड रिपोर्टमध्येही तुझी मैत्रीण तुझ्यापेक्षा पुढे आहे, तुझ्यापेक्षा बेटर आहे, असा टोमणा या वडिलांना मारायचा आहे. पाहा व्हायरल होणारी ही पोस्ट.

आणखी वाचा : दिवाळीसाठी ग्रीटिंग कार्ड मिळाले नाही म्हणून तिने…; लॉकडाउनमधील गैरसोयीतून सुचलेल्या कल्पनेने काय केले पाहा

व्हायरल पोस्ट :

कदाचित सर्वांचेच पालक कोणत्यातरी गोष्टीवरून असा टोमणा नक्की देत असतील, त्यामुळेच कदाचित नेटकऱ्यांना ही पोस्ट आवडली असून त्यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : लडाखमधील मुलीच्या बॅटिंग स्किलची नेटकऱ्यांना पडली भुरळ! आवडता क्रिकेटर कोण विचारताच म्हणाली…

नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया वाचून प्रत्येक घरात हेच होत असल्याचे कळून येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi dads hilarious message to his daughter regarding her blood report is going viral see netizens reaction pns