Diva station Escalator Goes In Opposite Direction: एस्केलेटर आता मॉलपासून, रेल्वेस्टेशनपर्यंत कॉमन झालं आहे. एक काळ असा होता जेव्हा लोकांना याचं अप्रुप वाटायचं, पण आता मात्र ते सर्वांसाठी फारच कॉमन झालं आहे. ज्यामुळे जिने चढावे लागत नाही आणि त्यामुळे थकवा येत नाही. फक्त एक पाऊल टाकायचं आणि हे एस्केलेटर तुम्हाला वरच्या किंवा खालच्या मजल्यावर पोहोचवते.आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा आज पन्हा चव्हाट्यावर आलेला दिसला. दिवा स्टेशनवर अचानक सरकता जिना अचानक उलटा फिरला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. दिवा स्टेशनवरील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तुम्हीही दिवा स्टेशनवरील हा सरकता जिना वापरत असाल तर हा थरारक व्हिडीओ बघाच…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल

दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला दिसला. स्टेशनवर वीज नसल्याने वर जाणारा सरकता बंद होता. पण त्याचवेळी वीज आल्याने तो सरकता जिना उटल्या म्हणजे उतरत्या बाजून सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. हा जिना अचानक सुरु होऊन वर जाण्या ऐवजी तो उलट्या बाजूने सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. असा अचानक झालेला हा बदल नागरिकांच्या लक्षात आला नाही.हा जिना जरी प्रवाशांच्या सोयीसाठी लावला असला तरी तो दिवसातून किमान २ ते ३ वेळा बंद पडतोच. हा जिना फलाट एक आणि दोनच्या मध्ये मधल्या ब्रिजला जोडलेला आहे.

सरकता जिना अचानक उलटा फिरला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सरकता जिना वर जाण्याऐवजी खालच्या दिशेने जाऊ लागल्याने प्रवासी एकमेकांवर आपटले. सरकत्या जिन्याचा प्रवास उलट दिशेने सुरु असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबवण्यासाठी असलेले आपत्कालीन बटण दाबले. परिणामी जिना त्वरीत थांबला.देखभाल-दुरुस्तीअभावी एस्कलेटरचा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचं या घटनेवरुन दिसून आलं. पुलावर जाण्यासाठी पायऱ्या चढण्याचा त्रास वाचवण्यासाठी या सरकत्या जिन्यांचा वापर हजारो प्रवाशांकडून करण्यात येतो. मात्र हा ‘शॉर्टकट’ जीवावर बेतण्याची भीती प्रवाशांमध्ये आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भरदिवसा जीममध्ये महिलेवर जबरदस्ती; मिठी मारली कपडे फाडले अन्… विनयभंगाचा संतापजनक VIDEO समोर

पण हे कळताच काही नागरिकांना सरकता जिना उतरुन दुसऱ्या जिन्याचा वापर केला. या जिन्याच्या सारख्या तक्रारी प्रवाशांकडून येत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जिन्याच्या तक्रारीकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे, असे प्रवाशांचे मत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diva staion escalator goes in opposite direction suddenly panics commuters shocking video goes viral srk
Show comments