Viral Video : आज कोणती भाजी करावी? हा प्रश्न अनेकांना पडतो. कधी कधी तर घरी भाजीचं सुद्धा नसतं आणि पोळी भाजी करायचा कंटाळा येतो. अशा वेळी काय करून खावं, असा प्रश्न पडतो. आज आपण अशाच एक हलक्या फुलक्या रेसिपी विषयी जाणून झटपट बनवू शकता. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या खास चटणी भाताच्या रेसिपी विषयी सांगितले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चटणी भात कसा बनवतात? तर चटणी भात बनवायला अगदी सोपी आहे. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – सुरुवातीला शिजवलेला भात घ्या. या भातावर घाटी मसाला किंवा चटणी टाका. थोडे तेल टाका. नीट मिक्स करून घ्या. मसाला भात तयार होईल. जर तुमच्याकडे शिजवलेला भात तयार असेल तर तु्म्ही ही खास डिश कधीही बनवू शकता. याची चव अप्रतिम वाटते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
methanekar_sushmita या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चटणी भात तुम्ही खाल्लाय का कधी? फोडणीचा भात बनवताना गॅसच संपला मग काय..भूक तर खूप लागलेली म्हणून लगेचच हा चटणी भात करुन खाल्ला”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, ” कोण कोण शाळे मध्ये डब्याला घेऊन गेले आहेत असे..” तर एका युजरने लिहिलेय, “हो खूप भारी लागतं कुठल्याही भाजीची आणि वरणाची अजिबात गरज लागत नाही याची चवच खूपच वेगळी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “ह्या चटणी भातासोबत कांदा खायला अजून मजा येते” एक युजर लिहितो, “हे सुख आहे, ज्यांनी खाल्लाय त्यांनाच कळणार हे सुख.” तर एक युजर लिहितो, “तोंडाला पाणी सोडलं , जुन्या आठवणी ताज्या केल्या” तर एक युजर लिहितो, “दुपारी आई झोपली की हेच चोरून खायचो आम्ही. तेव्हा मॅगी वगैरे कुठलं आलंय मिळायला. २८ वर्षाची झाले तरी कधी कधी मनात आलं की असा चटणी तेल घेऊन खाते, पोटापेक्षा मन भरतं” एका युजरने लिहिलेय, “लहानपणीची सगळ्यात आवडती गोष्ट…. शाळेतून आलं की असली भूक लागलेली असायची, भात चटणी तेल म्हणजे वाह काय बोलायचं! आताच्या आई घरात सगळं टाईम टू टाइम करून ठेवतात, पण आताच्या जेवणाला सर नाही या चटणी भाताची..” अनेक युजर्सनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत.