Dog Saves Baby Viral Video: घरात बाळ किंवा लहानमुल असेल तर नेहमी आनंदाचे वातावरण असते. लहान बाळाच्या चेहऱ्यवरील हसू पाहताच आपल्या मन आनंदित होते. पण लहान मुलाकंडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. कारण नजर हटेपर्यंत ते कधी काय करतील हे समजत नाही. लहान मुलांचे सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.अलिकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आई कामात मग्न झालेली आहे आणि स्ट्रॉलरमध्ये बसलेले लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होतो पण तेवढ्यात निष्ठावंत कुत्रा धावत येतो अन् त्या बाळाचा जीव वाचवतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कुत्र्‍याच्या या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

कुत्र्याने वाचवला बाळाचा जीव (Dog Saves Baby’s Life)

X वर जासिम पठाण नावाच्या वापरकर्त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या लहान मुलाला घेऊन स्ट्रॉलरमध्ये काही काम करत असल्याचे दिसून येते. दरम्यान ती तिच्या कामात हरवलेली दिसत आहे. ती घराबाहेर एका उंच कठड्यावर उभी आहे. अचानक बाळ असलेले स्ट्रॉलर हळूहळू खड्ड्याच्या दिशेने जाऊ लागते. काही सेकंदात असे दिसते की स्ट्रॉलर बाळासह खड्ड्यात पडणार तेवढ्यात तिथे असलेल्या कुत्रा धावत तिथे येतो. खड्ड्यात पडणारा स्ट्रॉलरला मागून तोंडात पडतो ज्यामुळे तो खड्ड्यात पडत नाही. एवढंच नाही तर तो स्ट्रॉलर मागे ओढतो आणि बाळाचा जीव वाचवतो. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये कुत्र्याचा वेग आणि सतर्कता पाहून लोक आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी कुत्र्याला ‘हिरो’ अशी पदवी दिली. अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केली, “प्राणी प्राण्यांपेक्षा माणसांशी जास्त निष्ठावान असतात,” तर कोणी म्हटले, “या कुत्र्याला पुरस्कार मिळाला पाहिजे.”

नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक (Netizens praised it enthusiastically)

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने हे सिद्ध केले आहे की प्राण्यांचे प्रेम आणि निष्ठा माणसांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही. ते कधीकधी माणसांपेक्षा जास्त संवेदना दाखवतात, ज्यामुळे लोकांना धक्का बसतो. विशेषतः कुत्रे नेहमीच त्यांच्या निष्ठा आणि शौर्यासाठी ओळखले जातात. या घटनेने केवळ बाळाचा जीव वाचवला नाहीत तर लोकांना मानव आणि प्राण्यांमधील नाते किती खोल असू शकते हे देखील शिकवले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो सोशल मीडियावर सतत शेअर केला जात आहे. श्नानाचे शौर्य ही लोकांसाठी प्रेरणा बनली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, “कुत्र्यांची निष्ठा आणि संरक्षणात्मक वृत्ती नेहमीच हृदयाला स्पर्श करते. या व्हिडिओमध्ये, आईला याची जाणीवही नसताना या कुत्र्याने मुलाचा जीव कसा वाचवला हे पाहता येते. हे पुन्हा एकदा सिद्ध करते की कुत्रे फक्त पाळीव प्राणी नाहीत तर कुटुंबाचे रक्षक आहेत.”