तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा भुकंप झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या भीषण भूकंपामुळं जवळपास २० हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाची तीव्रता खूप जास्त असल्याने इमारतींच्या मलबे एकापाठोपाठ एक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. इमारत कोसळल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. हजारोंच्या संख्येत नागरिक इमारतीच्या ढीगाऱ्यात अडकल्याने सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली. भूकंपाच्या संकटामुळं संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. या भूकंपाचे थरकाप उडवणारे व्हिडीओ दिवसेंदिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण एका कुत्र्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण एक पाळीव कुत्रा ६० तासांहून अधिक वेळ इमारतीच्या मलब्याखाली अडकला होता. पण दैव बलवत्तर म्हणून या कुत्र्याचा जीव वाचला. मोठे शर्थीचे प्रयत्न करून तुर्कस्तानच्या बचावकार्य मोहिमेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या कुत्र्याचा जीव वाचवला. मनाला चटका लावून जाणारा हा व्हिडीओ ट्वीटरव शेअर करण्यात आला आहे. कुत्र्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

नक्की वाचा – Viral Video: साडी नेसून महिलेनं नदीत मारली कोलांटी उडी…स्विमिंगचा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा भुकंप झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकारकडून राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे मोठमोठ्या इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. इमारतींच्या ढीगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. राजधानी अंकारामध्येही मोठी हानी झाली आहे. लोकांना गरम कपडे आणि आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. परंतु, लोकांमध्ये हाणामारी होत असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे.

भूकंपाच्या संकटामुळं हजारो लोकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे या नागरिकांनी तात्पुरता निवारा मिळावा म्हणून तंबू, स्डेडियमवर निवारा घेतला आहे. पण इमारतींच्या मलब्याखाली अडकलेल्या एका कुत्र्याने जीव वाचवण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्या कुत्र्याने आत्मस्थिती ढासळू दिली नाही. ६० तासांहून अधिक काळ ढीगाऱ्यात अडकलेल्या या कुत्र्याने माणसांप्रमाणे हिंमत दाखवल्याची या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कुत्र्याचा हा व्हिडीओ @buitengebieden या युजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओ इंटरनेटवर इतका व्हायरल झाला आहे की, जवळपास ४ लाख व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog was rescued after more than 60 hours underneath the rubble in turkey earthquake dog shocking video clip viral on internet nss