रस्त्यावर दररोज रोज विचित्र घटना आणि विचित्र अपघात घडत असतात आणि अशा घटनांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशीच एक घटना सध्या ऑनलाइन व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका स्कूटीवर बसलेल्या महिलेने भररस्त्यात अचानक ब्रेक लावला आणि वर्दळीच्या रस्त्यावर अनेक वाहनांची धडक झाली. अचानक ब्रेक लावल्याने बससह अनेक वाहने एकमेकांवर धडकली आहेत.. विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडिओ विविध वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला. घर के कलेश नावाच्या एका वापरकर्त्याने ही क्लिप पोस्ट केली, ज्यामध्ये स्कूटी चालक महिलेने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी अनेक वाहनांची जोरदार टक्कर मारली आणि संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. एक दुचाकीस्वारासमोर अचानक एक महिला दुचाकी घेऊन येते. इकडे तिकडे न बघता ही दुचाकीवरून जाणारी महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. एवढंच नाही तर काकू अचानक ब्रेक मारून रस्त्याच्या मधोमध थांबते ज्यामुळे दुचाकीस्वाराला अचानक ब्रेक मारावा लागतो. परिणामी मागून येणारी बस दुचाकीस्वाराला जोरदार धडक देते. ज्यामुळे रस्त्याच्या मधोमध उभ्या काकूंनाही ही धडक बसते आणि त्या दुचाकीवरून खाली पडतात. दरम्यान बसने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या गाड्या अचानक बसला धडकतात. काकूंच्या एका चुकीमुळे रस्त्यावर साखळी अपघात झाला आहे. व्हिडीओच्या शेवटी एकमेकांना धडकलेल्या बसचे फोटो दिसत आहे. काही प्रवासी रस्त्यावर उतरून चालत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा – “बारक्याने मार्केट गाजवलंय!”, ‘कारभारी दमानं..!’ गाण्यावर चिमुकल्याची ठसकेबाज लावणी! गौतमी पाटीलला देखील टाकले मागे

नेटकऱ्यांचा संताप

व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रस्ता ओलांडणाऱ्या महिलेवर टिका केली आहे.

एकाने कमेंट केली की, “वो स्त्री है, कुछ भी कर सकती है!”

दुसऱ्याने कमेंट केली की, “नेहमी महिलाच अशा का वागतात”

तिसऱ्याने कमेंट केली, या “महिलेला लायसेन्स देणाऱ्याला आधी अटक करा”

चौथ्याने कमेंट केली की, “एक नारी सब पे भारी”

पाचव्याने कमेंट केली, “नारी शक्ती”

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर quicks_official म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “स्कूटीवर बसलेल्या महिलेने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर अनेक वाहनांची एकमेकांना धडकल्या. संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अशा अपघातांना कोण जबाबदार आहे असे तुम्हाला वाटते?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domino effect crash sudden scooty brake causes multi vehicle pileup internet reacts watch snk