Drunk man sleeps on train track: कोणावर कधी कोणता प्रसंग ओढावेल हे सांगता येत नाही. आपल्यासोबतही अशा अनेक घटना घडतात, ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसेल. कधी कोणावर मृत्यू ओढावेल आणि कधी कोण मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येईल, सांगता येत नाही. असंच एक प्रकरण आता उत्तर प्रदेशातून समोर आलं आहे. नेमकं काय घडले, ते जाणून घेऊया…

सोशल मीडियावर अनेकदा कल्पनेच्या पलिकडचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यात काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहिल्यावर भीतीने अंगावर शहारे उभे राहतात. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरून एक ट्रेन भरधाव वेगाने निघून जाते. मात्र, त्या व्यक्तीला काहीच दुखापत होत नाही. मात्र व्यक्तीला जिवंत पाहून सगळेच थक्क झाले आहेत. 

हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून समोर आला आहे. ट्रेन आपल्या गतीने आपल्या गंतव्यस्थानाकडे जात असताना अचानक एक व्यक्ती लोकोमोटिव्ह समोर दिसली. एका व्यक्तीला ट्रेनने धडक दिल्याची माहिती लोको पायलटने जीआरपीला दिली. यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

हे प्रकरण बुधवारी रात्री उशिरा बिजनौर शहर कोतवालीचे आहे. जिथे एका व्यक्तीच्या अंगावरुन ट्रेन गेली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक, एक व्यक्ती दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर झोपला होता. त्याला कोणीतरी पाहिले आणि एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ती व्यक्ती जिवंत असल्याचे पाहून ते चक्रावून गेले. वास्तविक, ती व्यक्ती अजूनही रेल्वे रुळावर पडून होती पण त्याला काहीही झाले नव्हते. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला उचलले तेव्हा त्याच्या अंगावर कुठेही खरचटले नव्हते.

(हे ही वाचा : कंगाल पाकिस्तानातील लोकांनी झपाट्याने वजन घटविण्यासाठी सुचविला अनोखा मार्ग; Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल )

पोलिसांनी त्याला उठायला सांगितल्यावर तो धक्काबुक्की करू लागला, यावरून तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. चौकशीत त्याने सांगितले की, तो नेपाळचा रहिवासी असून त्याचे नाव अमर बहादूर आहे. अमर बहादूरच्या अंगावरुन संपूर्ण ट्रेन गेली होती, त्याला जिवंत आणि सुस्थितीत पाहून रेल्वे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. या व्यक्तीचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

रात्रीच्या अंधारात रेल्वे पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीचा शोध घेत घटना घडलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिस कर्मचारी त्याची विचारपूस करत असून त्याला उठण्यास सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेक लोकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.