हल्ली पदार्थांसोबत नवनवे प्रयोग करून नवं काय तरी तयार करण्याचा अट्टहास दिसतो. गेल्या काही वर्षात अनेक नवे पदार्थ नेटकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. मात्र या पदार्थांची चव कशी आहे? याबाबत ज्याचं त्याला माहिती असेल. पण रोज नव्या पदार्थ्यांच्या डिश नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कधी तोंडाला पाणी सुटतं, तर कधी केलेले प्रयोग पाहून संताप होतो. कधी कधी पदार्थांसोबतचे नवे प्रयोग यशस्वी होतात. तर कधी पदरी निराशा पडते. काही दिवसांपूर्वी फायर पाणीपुरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अंडा पाणीपुरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हो आपण वाचलं ते अगदी खरं आहे. सूरतमध्ये एका फेरिवाल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासठी अंडा पाणीपुरी सुरु केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंडा पाणीपुरीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अंडा पाणीपुरी बनवण्यची पूर्ण प्रक्रिया आहे. सुरुवातीला फेरीवाला एका तव्या तेल टाकतो. त्यानंतर त्यात कापलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, दोन अंड्याचा पिवळा बलक टाकतो आणि स्मॅश करतो. पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवतो.

एका प्लेटमध्ये पाणीपुरीत ही ग्रेव्ही भरताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्यावर तो दहि आणि पनीरचा किस टाकतो. अशाप्रकारने अंडा पाणीपुरी तयार होते. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. मात्र असं करत असताना युजर्संनी अशा रेसिपींना नापसंती दर्शवली आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘असे पदार्थ खाऊन पोटाला त्रास होणार, त्यामुळे असे विचित्र प्रयोग बंद करा’. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘अशा प्रयोगामुळे लोकं मुळ पाणीपुरीचा स्वाद विसरून जातील.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egg panipuri receipe viral on social media rmt