Elephant disable electric fence viral video: पशु पक्षी त्यांच्या हुशारीने आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करत राहतात. प्राण्यांच्या करामतीचे एकापेक्षा एक व्हिडिओ नेहमीच चर्चेत येत असतात. कधी कावळा बोलताना दिसतो तर कधी पोपट सायकल चालवताना दिसतो. कधी हत्ती अंघोळ करताना दिसतो तर कधी पाण्यात खेळताना दिसतो. अशाच एका हत्तीच्या व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका हत्तीने विजेच्या (इलेक्ट्रिक) तारांचे कुंपण कुशलतेने बंद करून सुरक्षितपणे रस्ता ओलांडून जाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये, हत्ती विद्यूत प्रवाह सुरू असलेल्या तारांच्या समोर उभा असलेला दिसत आहे. असे विजेच्या तारांचे कुंपण ओलांडताना विजेचा धक्का लागल्याने अनेकदा प्राणी आपला जीव गमावतात पण हत्ती मात्र स्वत:च जीव हुशारीने वाचवतो. हत्ती विजेच्या तारा लावलेल्या एका लाकडी खांबाजवळ जातो. शांतपणे आणि अचूकतेने, तो खांब सोंडेत पकडतो आणि खाली पाडतो. हे सर्व करताना तो विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही याची काळजी घेतो. तो खांब त्या तारांवर टाकतो. सावकाशपणे पाऊल टाकत तो तारा ओलांडतो.
व्हिडिओ पहा:
६,००,००० हून अधिक व्ह्यूज मिळालेला हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान यांनी एक्स वर शेअर केला आहे. “हा हत्ती भौतिकशास्त्रात मास्टर आहे,” त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. “पहा त्याने किती हुशारीने वीजेचे कुंपण निष्क्रिय केले… अशा अनेक घटनांचे दस्तऐवजीकरण(Documentation) देखील केले आहे. लवकरच एक अभ्यास प्रकाशित केला जाईल.”
या क्लिपमुळे ऑनलाइन कौतुकाचा वर्षाव झाला आहे, वापरकर्त्यांनी हत्तीच्या हुशार आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृतींचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “हत्तींमध्ये उल्लेखनीय संज्ञानात्मक(बौद्धिक) क्षमता आहेत.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हत्ती बुद्धिमान प्राणी आहेत. माझी पूर्णवेळ नोकरी मला त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवू देत नाही पण निवृत्तीनंतरची माझी हीच योजना आहे. त्यांना पृथ्वीवर त्यांचे योग्य स्थान द्या.”
तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग विसरा. हत्तींची बुद्धिमत्ता आणि शिक्षण हा अभ्यासाचा विषय आहे.”
हत्तींनी त्यांची भावनिक आणि बौद्धिक क्षमता दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक हृदयस्पर्शी क्षण कैद झाला आहे जिथे दोन हत्तींनी त्यांच्या केअर टेकरला मुसळधार पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. शरीराचा वापर करून त्याचे रक्षण केले. त्या हृदयस्पर्शी कृतीमुळे या प्राण्यांमध्ये आणि त्यांची काळजी घेणाऱ्या मानवांमध्ये असलेल्या असाधारण नात्याबद्दल लोकांची प्रशंसा आणखी वाढली.