Father Emotional Video: आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाप घराचा आधार असतो. दिवस-रात्र खूप कष्ट करून, मेहनत करून तो घरी येतो. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी दोन वेळचं अन्न मिळण्यासाठी, तसंच मुलांच्या भविष्यासाठी तो राब राब राबत असतो. आपल्या लेकरांसाठी धडपडणारा बाप अनेकदा दु:ख मनात ठेवून, त्यांच्यासाठी झिजत असतो. त्यात गरिबी वाट्याला आली असेल, तर कष्ट करण्यावाचून काहीच पर्याय उरत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरासाठी झिजणारा हा बाप बाहेर जाऊन किती कष्ट घेतो, हलाखीच्या दिवसांत पोटाची खळगी भरावी यासाठी किती मेहनत घेतो हे कधी कधी त्याच्या कुटुंबालाही माहीत नसतं. सध्या बापाचा हृदय पिळवटणारा एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक बाप अखंड मेहनत घेताना दिसतोय.

बापाचे कष्ट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस डोक्यावर एक ट्रे आणि थोडं सामान घेऊन धावत सुटलाय. त्याला जी ट्रेन पकडायची होती, ती स्थानकावरून सुटली असल्यानं एका हाताना ट्रे पकडत प्लॅटफॉर्मवरून उतरून तो ट्रेनच्या मागे सुसाट धावताना दिसतोय. अगदी जीवाचं रान करून तो ट्रेन पकडण्याच्या तयारीत आहे. आजूबाजूचं कसलंच भान न ठेवता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता, तो रुळांवरून धावत धावत ट्रेनच्या मागे जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. शेवटी ट्रेनच्या दरवाजाला पकडत तो वर चढला आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @success_life_tips_55 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, याला ‘एक मर्द अपना घर चलाने के लिए क्या कुछ नहीं करता’ (एक माणूस आपलं घर चालवण्यासाठी काय काय नाही करत), अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ७.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

मेहनती माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “धावण्याचा हा वेग सांगतोय की, त्याचं घर कसं आणि कशा प्रकारे चालत असेल.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “आणि मुलं म्हणतात, बाबा तू आमच्यासाठी काय केलंस?” एकानं, “ज्याच्याकडे जबाबदारी आहे, तोच हे दुःख समजू शकतो,” अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of father running behind train to earn money hard work video viral dvr