मातृत्व ही महिलांच्या जिवनातील सुंदर अनुभव असतो.कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड कौतुक करीत असतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गायीचेही डोहाळ जेवण करीत, गायीच्या मातृत्वाचा उत्सव साजरा केला आहे. एका हौशी शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गाईचं डोहाळे जेवण ठेवलं होतं. हौसेला मोल नसते. मग कृषी संस्कृती जपणाऱ्या भारतात बळीराजा आपल्या परिवाराची नाही तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो. कृषी संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेल्या गाईचे डोहाळे जेवण शेतकऱ्याने एखाद्या लग्नासारखे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हौसेपोटी लोक काय करतील याचा नेम नाही, याचंच एक उदाहरण समोर आलंय. कोल्हापुरात एका शेतकऱ्यानं चक्क आपल्या गाईचं डोहाळे जेवण घातलं आहे. एवढचं नाहीतर या कार्यक्रमासाठी या शेतकऱ्यानं लाखोंचा खर्च केलाय. गावच्या वेशीवर बॅनर लावण्यापासून ते घरासमोर मोठा मंडप घालण्यापासून सगळी हौस या मालकानं केली. यावेळी हजार लोकांच्या पगंती बसल्या. गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला अन् ओटीपूजन केले. आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यात आले. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला परिसरात चांगलीच चर्चा आहे. मालकानं या गाईचं नाव लावण्या ठेवलं असून, कार्यक्रमात लावण्याचं डोहाळे जेवण असा मोठा बॅनरही लावण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ट्रॅक्टरवरची स्टंटबाजी जीवावर बेतली; शरीराचे लचके निघाले, Video पाहून उडेल थरकाप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्याही हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस उतरला आहे. हा व्हिडीओ @sagar_patil_khillarpremi या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers celebrate cow dohale jevan program in kolhapur video viral on social media srk