जगातील सर्वात महाकाय प्राणी किंवा पक्षी कोणता असे विचारले तर काहींना त्याचे सहज उत्तर देता येईल, पण जगातील सर्वात महाकाय कीटक असा जर कोणी प्रश्न विचारला तर अनेकांना याचे उत्तर देता येणार नाही. पण, नुकतीच जगातील सर्वात महाकाय किटकाबद्दलची माहिती समोर आली आहे. हा कीटक इतका मोठा आहे की, त्याचे वजन तीन उदरांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे या महाकाय किटकाबद्दल जाणून घेण्यास आता बरेचजण उत्सुक आहेत.
या महाकाय किटकाचे नाव आहे वेटा. ज्याने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. किटकांमध्ये त्याला हेवीवेट चॅम्पियन असे म्हटले जाते. ७१ ग्रॅम वजनाच्या या किटकाने पृथ्वीवरील सर्वात वजनदार कीटक असल्याचा किताब पटकावला आहे. यावर आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे कीटक इतके वजनदार होण्यासाठी नेमकं खातात तरी काय? त्यांचे आवडते खाद्य गाजर आहे. या किटकांना गाजर खायला खूप आवडते. त्याचा गाजर खातानाचा एक फोटो व्हायरल होत आहे.
जायंट वेटचा गाजर खातानाचा फोटो @gansnrosesgirl3 हा एक्सवर शेअर केला आहे. ज्यानंतर तो खूप व्हायरल होत आहे. फोटोग्राफर मार्क मॉफेट यांनी हा फोटो क्लिक केला आहे, फोटो शेअर करताना युजरने लिहिले की, “जायंट वेटा हा जगातील सर्वात जड कीटक आहे, ज्याचे वजन ७१ ग्रॅम आहे, जे उंदरापेक्षा तिप्पट आहे. तो गाजर खातो. त्याचे फोटो मार्क मॉफेटने काढले आहे.
हा कीटक न्यूझीलंडचा मूळ मानला जातो. एवढेच नाही तर हा महाकाय वेटा नामशेष होण्याचा धोका आहे. तो १७.५ सेंटीमीटर किंवा ७ इंच लांब वाढतो. हा जड किडा सामान्य उंदरापेक्षा तिप्पट वजनदार आहे. चिमणीच्या वजनापेक्षा किटकाचे वजन जास्त आहे. “वेटा” हे नाव माओरी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ ‘कुरूप गोष्टींचा देव’ असा होतो. हा एक शाकाहारी प्राणी आहे, जो ताजी पाने खातो; जरी कधीकधी ते इतर लहान किटकांनादेखील खातात. उंदीर आणि मांजर यांसारखे प्राणी त्यांची शिकार करत असल्याने त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे.