Girlfriend Boyfriend Fight Video Viral : सोशल मीडियावर नेहमीच रस्त्यावरील स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच, अनेकदा वाहनचालकांमधील भांडणाचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर रस्त्यावरील भांडणाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण- यात चक्क चालत्या दुचाकीवर एक प्रेमीयुगुल भांडताना दिसत आहे. हे भांडण इतकं टोकाला जातं की, प्रेयसी भररस्त्यात प्रियकराला मारहाण करताना दिसतेय.
प्रियकर बाईक चालवीत होता आणि प्रेयसी मागे बसून त्याला चप्पलने मारहाण करीत होती. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील खुर्रम नगर परिसरात घडली असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओमध्ये प्रेयसी रागाच्या भरात प्रियकराला चप्पलने मारल्याची घटना स्पष्टपणे दिसून येते आहे. यावेळी प्रियकर बाईक चालवण्यात व्यग्र असतो. त्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता. हा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला.
२० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये प्रेयसी प्रियकराला कधी डाव्या गालावर तर कधी उजल्या तालावर चपलेने मारहाण करतेय. चालत्या बाईकवर असताना ती तब्बल १४ वेळा त्याला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी सार्वजनिक ठिकाणी असं वर्तन करणं चुकीचं आहे, असे म्हटले आहे.
या घटनेमागील कारणांबद्दल अनेक युजर्सने विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. लखनऊ पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. खुर्रम नगर पोलिस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रेमीयुगलाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी लोकांना तथ्ये तपासल्याशिवाय असे व्हिडीओ शेअर करणे टाळा, असे आवाहन केले आहे.
वीडियो लखनऊ का बताया जा रहा है….
— Vandana Meena (@vannumeena0) May 20, 2025
जिसमें चलती बाइक पर लड़की लडके को पीट रही है.
पता नहीं क्या हो गया जो इसको पीट रही है
आपको क्या लग रहा है???
pic.twitter.com/C0fFlVj3y3
एका युजरने लिहिले की, मार खाण्यासाठी किंवा मारहाण करण्यासाठी कोणत्याही जागेची गरज नाही. दुसऱ्या एकाने लिहिले की, व्वा! भांडण्यासाठी किती चांगली जागा निवडली आहे. तिसऱ्या एकाने लिहिले की, नक्कीच त्याने तिच्यासाठी काहीतरी केले नसेल म्हणून तिला राग आला असेल.