उत्तर गोव्यातील वाल्पोई हे हिरव्यागार बागांसाठी ओळखले जाते. येथील आंब्यांचे शेतकरी असत्या नेस्टर रांगेलने(Nestor Rangel) यांनी आपल्या बागेतील मौल्यवान आंबे माकडांपासून वाचवण्यासाठी अफलातून युक्ती वापरली आहे. “मी माझ्या बागेतील मुख्य पिक असलेल्या आंब्याला माकडांपासून दूर ठेवण्यासाठी जांभळाच्या झाडावर काही जांभूळ मुद्दाम ठेवतो” असे TOIला माहिती देताना सांगितले. ही कल्पक युक्ती केवळ त्याच्या आंब्याचे रक्षण करते. जांभूळ कशाप्रकारे वापरता येऊ शकते यावरही प्रकाश टाकते.

गेल्या काही दशकांमध्ये उन्हाळी फळ म्हणून ओळखले जाणारे जांभुळ हे भरपूर व्हिटॅमिन सीयुक्त आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज कमी असलल्यामुळे मधुमेही लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. पण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांना तोंड देताना रांगेल यांच्या अनुभवानुसार जांभुळ कसे वापरता येऊ शकते हे जाणून घेऊ या.

जांभळाच्या औषधी मूल्यावर भर देताना ICAR-IIHR, बेंगळुरू येथील फळ विज्ञानात तज्ज्ञ असलेल्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. प्रिया देवी यांनी TOIला माहिती देताना सांगितले “भारताच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः गोव्यात जेथे ते उष्णकटिबंधीय हवामानामध्ये जांभळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ते विक्रीयोग्य आहे का याकडे दुर्लक्ष केले जाते.जांभुळ हे एक पौष्टिकतेने समृद्ध पीक आहे ज्यामध्ये पौष्टिक घटक आणि औषधी मूल्यही आहे, तरीही ते अद्याप व्यावसायिकदृष्ट्या कमी वापरले गेले आहे.”

हेही वाचा – दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

देवी यांनी सांगितले की, “जाभुळ केवळ फळ म्हणूनच नव्हे तर त्याच्या बियांच्या पावडर किंवा त्यापासून तयार केलेल्या चामड्याच्या स्वुरुपातही विविध संधी निर्माण करते. उद्यान तज्ज्ञांना आणि आयुर्वेदिक तज्ज्ञांना या जांभळाच्या बहुआयामी फायद्यांची क्षमता वापरण्यासाठी भरपूर वाव आहे. पण जांभळाचा पूर्ण क्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी नाविन्यपूर्ण पध्दती वापरण्याची आवश्यकता आहे.”

देवी यांनी जांभळाला सीमावर्ती पीक म्हणून वापरण्याचा पर्याय सुचवला. म्हणजेच बागांच्या आसपास जवळच्या अंतरावर आवर्जून जांभळाच्या झाडांची लागवड करावी. यामुळे बागेच्या जैवविविधतेत भर घातली जाते त्याचबरोबर कदाचित कीटकांना आणि माकडांना रोखण्यासाठी नैसर्गिक अडथळा म्हणून देखील काम करू शकते.

हेही वाचा – जंगलात अग्नितांडव! जीवाची बाजी लावून आग शमविणारे वनकर्मचारी ठरले ‘सुपर हीरो’; पाहा हा थरारक व्हिडिओ

जांभळू हे पिक गुरांचा चारा म्हणून वापरता येऊ शकते त्याची पाने गुरे किंवा वन्य प्राणी खातात. माकडे जांभळाच्या झाडांवरून उड्या मारताना दिसून शकतात पण याचा अर्थ असा नाही की शेतकरी अजूनही जांभळाचे भांडवल करू शकत नाहीत. शेतकरी जांभळाचा वापर केवळ उपउत्पादन म्हणून न करता त्याची व्यावसायिकदृष्ट्या उच्च-मूल्य असलेले उत्पादन म्हणून करू शकतात.

जांभुळन सध्या फळांच्या आकारानुसार १० रुपये प्रति डझन दराने विकले जात आहे. फळ विक्रेते साजिद शेख यांनी TOI ला सांगितले की, “गोवा जांभळाचे मूळ मूल्य ओळखतात आणि म्हणून प्रत्येक उन्हाळ्यात हे फळे खातात. पण, शेतकऱ्यांना फायदेशीर बाजारपेठेत उतरण्यासाठी नाविन्यपूर्ण लागवडीचा शोध घेण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.”