Oppo F31 Series Launch date: Oppoची नवीन स्मार्टफोन सीरिज भारतात लाँच होणार आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे की, Oppo F31 5G सीरिज १५ सप्टेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे. Oppo F31 सिरीजमध्ये अनेक फिचर्स अपग्रेड केले जात आहेत. या सीरिजचे फोन ७००० mAhच्या मोठ्या बॅटरी बॅकअपसह येणार आहेत. कंपनीने या मॉडेलच्या डिझाइनवर जास्त भर दिला आहे. यामध्ये मिलिटरी ग्रेडसारखा टिकाऊपणा असल्याचे बोलले जात आहे. हा नवीन Oppo F31 मिडनाईट ब्लू, क्लाउड ग्रीन आणि ब्लूम रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

कोणते मॉडेल लाँच होतील?

Oppoने शेअर केलेल्या माहितीनुसार, कंपनी F31 आणि F31 प्रो लाँच करणार आहे. या मॉडेलची जाडी ७.७ मिमी आहे आणि याचे वजन १९५ ग्रॅम असेल. याची ७००० mAhची बॅटरी सायकल चार्जिंगसाठी वापरली जाऊ शकते आणि ती पूर्ण ५ वर्षे चालेल असा दावा केला जात आहे. या मॉडेलसोबत Oppo जो चार्जर देणार आहे तो फक्त २० मिनिटांच ४२ टक्के फोन चार्ज करू शकतो. हा फोन रिव्हर्स चार्जिंगलादेखील सपोर्ट करेल आणि तो IP66+IP68+IP69 रेटिंगसह येईल. हे रेटिंग फोनला पाण्यामुळे नुकसानीपासून वाचवेल.

अधिक मजबूत

Oppo F31 हा नवा फोन अधिक टिकाऊ आणि मजबूत असणार आहे. Oppo F31 सीरिज ७ मिलिटरी स्टँडर्ड सर्टिफिकेशनसह सुसज्ज आहे. हा फोन बनवण्यासाठी एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम वापरण्यात आली आहे. फोनची आर्मर बॉडी याला मजबूत बनवते.

फोटो सौजन्य: गुगल ट्रेंड्स

आधीच्या अहवालांनुसार, F31, F31 Pro आणि F31 Pro+ नावाच्या फोनची एक नवी मालिका लाँच केली जाईल. बेस मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असेल. मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी F31 मालिकेत 80W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. F31 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर असल्याचे म्हटले जाते. तसंच Oppo F31 Pro+ मॉडेलमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असेल. या फोनमध्ये इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत, ती लाँचिंगच्यावेळी उघड होतील.