Viral Video : सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात की; जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरविणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता गावोगावी यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत हे मुख्य आकर्षण ठरत आहे. दरम्यान, अशाच एका बैलागाडा शर्यतीचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. बैलगाडा शर्यतीचा नाद काय असतो हे या व्हिडीओमध्य बघायला मिळालं आहे कारण ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आजोबा कुठे जाऊन बसले आहेत बघा. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

सध्या ग्रामीण भागात यात्रोत्सवात अनेकांना बैलगाड्यांच्या शर्यतींची क्रेझ असते. या शर्यती भलत्याच रंगात येताना पाहायला मिळतात. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अगदी नीट बोलायला न येणारे बाळ ते वयोवृद्धही येत असतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोठं मैदान दिसत आहे आणि मैदानाच्या भोवती गोल सर्व प्रेक्षक जमले आहेत. या भर उन्हात दुपारच्या वेळी बैलगाडा शर्यतीचं एका मैदानात आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सर्व बैलजोड्या तयार आहेत, तसेच काही शर्यतीही सुरु झाल्या आहेत. याच शर्यती पाहण्यासाठी लोक जमले आहेत. अशातच एक ओजाबा बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी चक्क एका झाड्याच्या टोकाला झाडाच्या फांदीवर जाऊन बसले आहेत. उंचावर जाऊन मस्त ते बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नाद पाहिजे फक्त…शेवटी शर्यतीच्या आयोजकांनीही याची नोंद घेतली यावेळी कॉमेंट्री करणाराही या ओजाबांचं तोंड भरून कौतुक करत आहे.

पाहा व्हिडीओ

ही बैलगाडा शर्यत पूर्वीपासून भरवली जाते. शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवताच्या ठिकाणी जत्रा, उरूस भरवून या शर्यतीचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीला छकडा किंवा शंकरपट, असं सुद्धा म्हणतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर bailgadapremi897 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandfather sat on a tree to watch the bailgada sharyat funny video goes viral on social media srk