Mother an son dance video viral : पळता पळता आपल्याला ठेच लागली आणि तोंडून आपसूक आईऽऽऽगं अशी आरोळी येतेच येते. आई आणि मुलांचं नातं इतकं नाजुक आणि घट्टं असतं की, त्या नात्याला कोणतीच उपमा नाही की तुलना नाही. आईने मुलाला जन्म दिल्यापासून तर त्याला त्याच्या पायावर उभं करण्यापर्यंत ते शेवटच्या श्वासापर्यंत आई मुलाच्या सोबत असते. अशातच माय-लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क नवरदेव आणि नवरदेवाच्या आईनं धुमाकूळ घातला आहे.आपल्या होणाऱ्या सुनेच्या स्वागतासाठी सासूबाईंनी तुफान डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…

सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यानं बायकोसमोर त्याच्या आईसोबत भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गल्यानं साखळी सोन्याची ही पोरी कोणाची या गाण्यावर आईनं आणि मुलानं नवरीसाठी खास डान्स केला आहे. यावेळी नवरदेव बायकोसोबत नाहीतर चक्क आईसोबत थिरकला आहे.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर .shreyy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “वाह वाह खूप छान”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom dance with mother for his bride on marathi song video goes viral on social media srk