आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. मग ते मित्राचं लग्न का असेना. अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि नवरदेव सॉफ्ट ड्रिंकची एक छोटी बाटली उघडतो आणि त्यातून एक चुस्की घेतो. परंतु काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. नवरदेवाचे मित्र त्याला कोल्ड्रिंकची बॉटल देतात. मात्र ते पिल्यावर नवरदेव खूप विचित्र रिअॅक्शन देतो. त्याला समजतं की त्याच्या मित्रांनी कोल्डिंगमध्ये काहीतरी मिसळून दिलं आहे. ते पिताना तो नवरीकडे पाहतो आणि नवरीलाही त्याच्या रिअॅक्शन वरुन ती कोल्ड्रिंक नसल्याचं समजतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: भर वस्तीत शिरलं अस्वल; आधी धुडगूस अन् मग लोकांवर करु लागला हल्ला

नवरदेवाच्या मित्रांनी कोल्डड्रिंकमध्ये चक्क दारु मिक्स करुन दिली होती. यावर कमेंट करून लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत. अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही. यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groom was secretly drunk by his friends while standing on the stage friends of groom gave weird thing bride funny wedding video viral on social media srk