काही दिवसांनंतर व्हॅलेंटाइन्स डे येणार आहे. प्रेमी-प्रेमिकांमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. या खास दिवसाआधी प्रेमाचा आठवडा सुरु होतो, ज्याला व्हॅलेंटाइन वीक असे म्हटले जाते. तथापि, हा आठवडा सुरु होण्याआधीच एक प्रेमी सध्या खूपच चर्चेत आहे. हा प्रेमी आपल्या मैत्रिणींना फिरवण्यासाठी बाईक चोरी करायचा. पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले आणि त्याची चौकशी केली, तेव्हा तो आपल्या मैत्रिणींना फिरवण्यासाठी मोटारसायकल चोरत असे, असे तो म्हणेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचे नाव सचिन आहे. तो दिल्लीमध्ये राहणारा आहे. चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले, त्याच्या मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी तो दुचाकी चोरायचा आणि नंतर मोटारसायकली कवडीमोल भावाने विकायचा. आतापर्यंत त्याने ४ बाईक चोरल्या आहेत. यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. मात्र यावेळी तो पोलिसांच्या हातून सुटू शकला नाही.

लाइव्ह डिबेटमध्येच सुरु झाली मारामारी! भांडणाचा Video Viral

गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी या चोराला पकडले. आरोपीकडून चोरीच्या तीन बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने सांगितले की त्याच्या एक नाही तर अनेक मैत्रिणी आहेत, ज्यांना तो फिरण्यासाठी बाईक चोरायचा. त्याची एक नाही तर अनेक मैत्रिणी आहेत. त्यांना फिरवण्यासाठी तो या बाईक चोरायचा आणि फिरून झाल्यावर तो त्या बाईक विकून नवीन बाईक चोरी करायचा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guy was stealing a bike to hang out with girlfriends pvp