हिवाळा सुरु झाला की कोणालाही घोंगडीतून बाहेर पडावेसे वाटतं नाही. त्यात घोंगडी असेल की समोर शेकोटी, हातात चहा म्हणजे सगळं झालं असं आपण नेहमीच म्हणतो. पण व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती घोंगडी मिळाल्यानंतर लगेच चालू लागते हे तुम्ही कधी पाहिले का? नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसल्याचे दिसते. त्यानंतर ती व्यक्ती घोंगडी मिळाली की तो दोन शब्द बोलतो आणि नंतर चालू लागतो. हा व्हिडीओ शेअर करत दीपांशू म्हणाले, ‘जादुई घोंगडी! घोंगडी मिळाल्यानंतर व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती चालू लागली…’ त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : सारा तेंडुलकर आणि शुभमन गील एकत्र बीचवर? दोघांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चा
आणखी वाचा : झुलन गोस्वामींच्या बायोपिकमधून अनुष्का करणार कमबॅक, पण टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘सर मेडिकल सायन्सला आता या पेक्षा अजुन काय पाहिजे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वाह वाह हे दिवस पण पाहायला मिळाले.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘भ्रष्टाचाराची सगळ्यांसमोर परिक्षा घेण्यात आली.’