Himachal School Principal Viral News : सध्याच्या काळात आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात, त्या घटनांचे व्हिडीओ किंवा फोटा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही फोटो किंवा व्हिडीओ अगदी मजेशीर असतात. ते पाहून अनेकजण पोट धरुन हसतात. यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू असते किंवा काही घटनांमध्ये एखाद्याला सोशल मीडियावर टोलर्स ट्रोल देखील करतात.
आता अशाच प्रकारे एका शाळेच्या मुख्याध्यापकाने लिहिलेला चेक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या चेकवर जवळपास सर्वच स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने लिहिलेले दिसत आहेत. ते पाहून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने स्वाक्षरी केलेल्या चेकवर लिहिलेल्या स्पेलिंगच्या चुका स्पष्ट दिसून येत आहेत. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
चेकवर नेमकं काय चुकीचं लिहिलं?
हिमाचल प्रदेशातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने २५ सप्टेंबर रोजी शाळेतील कामगाराला ७,६१६ रुपयांचा चेक दिला. मात्र, या चेकवर झालेल्या चुका पाहता बँकेने तो रद्द केला. मात्र, हाच विषय आता चर्चेचा बनला आहे. हा चेक शाळेच्या मुख्याध्यापकाने स्वाक्षरी केलेला असल्याचं सांगितलं जातं. त्या चेकवर स्पेलिंग लिहिताना अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं दिसत आहे.
हिमाचल प्रदेश के सिरमौर इलाके में एक सरकारी स्कूल के प्रिंसिपल ने एक चेक बनाया है, ये बच्चों को क्या पढ़ाते होंगे ?? pic.twitter.com/tQV2yGZQZc
— बैरिस्टर चढ्ढा (घटस्फोट विशेषज्ञ )…?? (Parody) (@rana_indrjeet) September 29, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला चेक ७,६१६ रुपयांचा असून ७,६१६ रुपयांची हीच रक्कम जेव्हा इंग्रजीत लिहिली तेव्हा इंग्रजीचं स्पेलिंग चुकीचं लिहिल्याचं दिसत आहे. या चेकवर मुख्याध्यापकाने ७ ला सवेन (Saven), १००० रुपयाला गुरुवार (Thursday) आणि १०० ला हरेंद्र (Harendra) असं लिहिल्याचं दिसत आहे. तसेच १६ चं स्पेलिंग देखील चुकीचं लिहिल्याचं दिसत आहे, पण ते अस्पष्ट असल्याने स्पष्ट ओळखू येत नाही.
या चेकवर सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शिक्का दिसत आहे. त्यानुसार हा चेक हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील असल्याचं समजतं. दरम्यान, या चेकवर शाळेच्या मुख्याध्यापकाची सही दिसत असली तरी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच हा चेक लिहिला की नाही? हे स्पष्ट होत नाही. मात्र, त्या चेकवर स्वाक्षरी करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी स्पेलिंग तपासल्याचं दिसत नाही
दरम्यान, याावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. एका युजर्सने लिहिलं की, “शिक्षकांची ही अवस्था आहे, म्हणूनच कोणीही त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवू इच्छित नाही. आमच्यासारख्या लोकांना ज्यांनी सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतलं त्यांना खूप वाईट वाटतं. सर्वत्र व्यवस्था बदलत आहेत, मग शाळा का नाही.”