देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील असं आश्वासनही पंतप्रधानांनी देशाच्या जनतेला दिलं. मात्र याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते संबित पात्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पात्रांविरोधात तक्रार दाखल केल्याने ते चर्चेत असतानाच आता २० लाख कोटींमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
झालं असं की मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केल्यानंतर एका लाइव्ह टीव्ही शो दरम्यान चर्चा सुरु होती. यामध्ये भाजपाची बाजू मांडण्यासाठी पात्र सहभागी झाले होते तर काँग्रेसच्या वतीने पक्षाचे प्रवक्ते चरण सिंह सापला सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असताना सापला यांनी पात्रा यांना २० लाख कोटींमध्ये किती शून्य असतात असा प्रश्न विचारला. यावेळी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकानेही पात्रा यांना उत्तर द्याचं असेल तर देऊ शकतात असं सांगितलं. मात्र पात्रा यांना उत्तर देणं टाळलं. त्याऐवजी त्यांनी, “नाही मी या प्रकराच्या ट्रीकी (गोंधळात टाकणार) प्रश्नांबद्दल बोलू इच्छित नाही,” असं सांगितलं. पात्रा यांनी मोदी सरकराने केलेली घोषणा ही ऐतिहासिक आणि कौतुकास्पद असल्याचे मत कार्यक्रमामध्ये नोंदवले
20 लाख करोड़ में कितने ज़ीरो होते हैं,
ये बताने की जिम्मेदारी मोदी जी ने संबित पात्रा को दी थी
लेकिन फिर भद्द पिटवा दी भाई ने
pic.twitter.com/hoBZscrIxp— Punit Kumar Singh (@puneetsinghlive) May 12, 2020
पात्र यांच्या या उत्तरचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यांना विरोधकांकडून ट्रोल करण्यात येत आहे.
नक्की पाहा >> Viral Memes: “कोणीतरी हिंदीची डिक्शनरी द्या रे”, “मोदींचं हिंदी ऐकून देश आणखीन गोंधळला”
१)
20 लाख करोड़ में कितनी शून्य हैं? कल रात 8 बजे @aajtak ने संबित पात्रा से पूछा था,लेकिन अभी तक बताया नहीं, आख़िर क्यों???? जवाब दीजिये।।।।।।।।।।। @sambitswaraj
— K.C.Meena Dausa (@KCMeenaNRly) May 13, 2020
२)
20 लाख करोड़ में कितने जीरो होती है ये संबित पात्रा को नहीं पता
हर बार बेज्जती करवा लेता है! @sambitswaraj pic.twitter.com/GLDhtj80GP
— Deepak Khatri (@Deepakkhatri812) May 13, 2020
३)
कुपात्रा की पोल फिर खुली नही बता पाया की 20 लाख करोड़ में कितने जीरो होते हैं pic.twitter.com/rOAnNy6IB1
— ChandraShekhar Bhankrota चंद्रशेखर भांकरोटा (@YUVAMARWADI) May 13, 2020
४)
संबित पात्रा जी ने गूगल किया?
20 लाख करोड़ में कितने ‘0’ होते हैं— Ashraf Hussain (@AshrafFem) May 12, 2020
५)
संबित पात्रा ने किया गणित विषय के जानकारों से संपर्क
संबित पात्रा पूछ रहे हैं कि 20 लाख करोड़ में कितने जीरो होते हैं।@LambaAlka @rohanrgupta @GouravVallabh
— Harish R. Dewasi (@HarishDewasiINC) May 12, 2020
६)
20 लाख करोड़ में कितने जीरो होती है ये संबित पात्रा को नहीं पता
हर बार बेज्जती करवा लेता है! @sambitswaraj pic.twitter.com/3dgjYdcP8l
— राहुल नामा (@Rahulnama0) May 13, 2020
७)
ये नाइंसाफी है यार.!
लोग बेचारे को हर बार जीरो में ही लटका देते हैं— Mobeen Salmani (@MobeenSalmani4) May 12, 2020
८)
इतनी मेहनत के बाद भी उसे पता नहीं है कि कितने शून्य हैं
— Waseem Siddiqui (@waseems16339443) May 12, 2020
९)
Mathematics ko gk bol tha hai.
— Asif R Barkati (@asifRB04) May 13, 2020
याआधीही पात्रा यांना लाइव्ह शोदरम्यान असाच प्रश्न विचारण्यात आला होता. २०१९ साली सप्टेंबर महिन्यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या पात्रा यांना काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात हा प्रश्न विचारला होता. ‘केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटलाच करत आहे,’ असं सरकारची बाजू मांडताना पात्रा यांनी सांगितलं होतं. त्यावर वल्लभ यांनी ‘पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात तेवढं फक्त येथील उपस्थितांना सांगा,’ अशी विनंती पात्रा यांच्याकडे केलेली. यावर पात्रा यांनी उत्तर देण्याऐवजी थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली होती. ‘मला विचारण्याआधी राहुल गांधींना विचारुन या पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात ते,’ असं उत्तर पात्रा यांनी दिले होते. यावर वल्लभ यांनी ‘सतत पाच ट्रिलियन पाच ट्रिलियन आरडाओरड करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात हे ही ठाऊक नाही. पात्राजी काही हरकत नाही पुढच्या वेळेस पाठ करुन या,’ असा टोला वल्लभ यांनी लगावला होता. वल्लभ यांनी केवळ ट्रिलियनवर १२ शून्य असतात असं सांगितलं. इतकचं नाही तर बिलियन, मिलियनमध्येही किती शून्य असतात हे ही वल्लभ यांनी सर्वांना सांगितले.