दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला? VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल!

हा व्हायरल व्हिडीओ तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवून जाणारा आहे. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

Horse-Video-Viral
(Photo: Twitter/ Dipanshu Kabra)

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास असणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो, तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच अडखळतो, तर स्वतःवर विश्वास असेल तर तो माणूस हसत हसत प्रत्येक अडथळे पार करतो. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे, याची साक्ष देणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

घोड्याने स्वतःला मरणाच्या दाढेतून बाहेर काढलं
हा व्हिडीओ एका घोड्याचा आहे, जो समोरून येणाऱ्या दोन धावत्या ट्रेनमध्ये अचानक अडकतो. दोन्ही ट्रेनच्या मधल्या जागेत हा सफेद घोडा अडकलेला पाहताच ट्रेनमध्ये बसलेले काही लोक जोरजोरात ओरडू लागतात. पूर्वी संथ धावणारा घोडा लोकांचा आवाज ऐकून वेगाने धावू लागतो. दोन्ही बाजुला सुसाट वेगाने धावत्या ट्रेन आणि या दोन्ही ट्रेनच्या मधोमध तितक्याच वेगाने धावणारा हा सफेद घोडा, हे चित्र पाहून अनेकांनी रोखून धरला. लोकांच्या आवाजानंतरही घोडा मार्ग न बदलता सरळ रेषेत धावत राहिला आणि शेवटी दोन ट्रेनमधून तो सुखरूप बाहेर पडला. जर तो थोडा सुद्धा डावीकडे घसरला असता तर ट्रेनखाली येऊन त्याचा मृत्यू देखील झाला असता. पण या घोड्याने संयम राखून पलीकडची ट्रेन जाण्याची वाट पाहत आपली धाव कायम ठेवली.

आणखी वाचा : लग्नात नवरा नवरीने केला जबरदस्त क्लासिकल डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की अशा परिस्थितीत कोणत्याही माणसाचा तोल गेला असता, पण घोड्याने प्राणी असूनही त्याचा विश्वास डगमगू दिला नाही, जर त्याचा पाय इकडे तिकडे पडला तर त्याचा जीव गेलाच असता. हा व्हिडीओ सर्वांना एक धडा शिकवतो की जेव्हा एखादा प्राणी स्वतःला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतो, मग माणूस का नाही. माणसाकडे तर बुद्धी आणि विवेकाचा साठा असतो. म्हणूनच नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, तरच तुम्ही तुमचे ध्येयापर्यंत सहज जाऊ शकता.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चिमुरडीच्या हुशारीसमोर आईही हरली, तिने जे केलंय त्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Panda Video : पांडा पाण्यात खेळतानाचा VIRAL VIDEO पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “घोडा दोन्ही ट्रेनमध्ये अडकला. त्याला कसं धावायचे हे माहित होतं, मार्ग न बदलता धावत राहिला आणि शेवटी बाहेर पडला. जणू काही जीवनाचा धडा या छोट्याशा व्हिडीओमध्ये आहे.” अडचणींच्या गर्तेत अडकून विचलित होऊ नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहा.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता? होय, ड्रायव्हर विनाच धावू लागलं ट्रॅक्टर! पाहून तुम्ही म्हणाल, ‘जादू’

हा व्हिडीओ Dipanshu Kabra नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आवर्जून हा व्हिडीओ त्यांच्या वेगवेगळ्या ग्रूपवर शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर लोक वेगवेगळे कमेंट्स शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How the horse trapped between two trains coming from the front saved his life watching the video will stop breathing prp

Next Story
IPL 2022 : लखनऊ संघाचं नाव ठरलं..! मालक संजीव गोयंकांनी केली घोषणा; पाहा VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी