scorecardresearch

Panda Video : पांडा पाण्यात खेळतानाचा VIRAL VIDEO पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू

या गोंडस पांडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. तसं, या पांडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला त्याचे बालपणही आठवते.

Panda-Bath-Video
(Photo: Twitter/ buitengebieden_)

सोशल मीडियावर दर दिवशी काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. देशविदेश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील हे व्हिडीओ पाहत असताना अनेकदा त्यांच्याबाबतची उत्सुकता आणि कुतूहल सर्वांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या व्हिडीओंपैकी एक म्हणजे प्राण्यांच्या दंगामस्तीचे व्हिडीओ.

सध्या असाच एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पांडा म्हणजे काहीसा आळशी प्राणी म्हणून ओळख असणारा हा सुपरक्यूट गोडू दंगा करताना दिसत आहेत. बऱ्याचदा वीकेंड आला किंवा आळसावल्यासारखं वाटू लागलं की, पांडाचाच एखादा व्हिडीओ किंवा जिफ फाईल शेअर केल्या जातात. इतकंच नव्हे तर, काहीजण तर आपल्यालाही असा निवांत आणि टंगळमंग करत वेळ व्यतीत करायचा आहे, अशी अपेक्षाही अनेकजण व्यक्त करतात.

आणखी वाचा : नवरीला उचलायला गेला अन् सर्व पाहूण्यांसोर धाडकन कोसळला…VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

या गोंडस पांडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. तसं, या पांडाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला त्याचे बालपणही आठवते. असे बरेच लोक असतील ज्यांनी बालपणात अंघोळ करताना पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला असेल. पांडाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये पांडा पाण्यात छान आरामात बसून पाण्यात खेळत खेळत अंघोळीचा आनंद घेताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता? होय, ड्रायव्हर विनाच धावू लागलं ट्रॅक्टर! पाहून तुम्ही म्हणाल, ‘जादू’

अगदी लहान बाळ पाण्यात खेळ लागतो अगदी त्याप्रमाणे हा पांडा पाण्यात मनमुराद खेळताना दिसून येत आहे. त्यांचे क्यूट एक्सप्रेशन्स पाहून लोक या पांडाच्या प्रेमात पडू लागले आहेत. पाण्यात फटके मारत तो तलावातलं पाणी उडवताना दिसून येत आहे. तलावाच्या पाण्यात या पांडाचा खेळणं बागडणं पाहून तुम्ही तुमचं दिवसभरातलं सारं दुःख विसरून चेहऱ्यावर गोड स्माईल द्याल, हे मात्र नक्की.

आणखी वाचा : लग्नात नवरा नवरीने केला जबरदस्त क्लासिकल डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता कोंबड्यावरही चढला ‘Pushpa’ फिवर, ‘Srivalli’ गाण्यावर त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

पांडाचा हा गोंडस व्हिडीओ buitengebieden_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. या क्यूट पांडाचा व्हिडीओ पाहून लोकांना तो सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र आवरता येत नाहीय. बघता बघता हा गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर साडे तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा गोड व्हिडीओ रिट्वीट करत शेअर केलाय.

आणखी वाचा : रिपोर्टरने घेतली ‘बिहारी बॉय’ची मुलाखत, मुलाच्या मजेशीर उत्तराचा VIDEO VIRAL

अनेकजण या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहलं की, हे खूप गोंडस आहे, मला दिवसभरही याला पाहायला आवडेल. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले आहे, पाण्यात मजा करताना पांडा किती गोंडस दिसतो आहे. चक्क पांडाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठीही अनेकांनीच इच्छा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Panda splashing around in a pool may give you happy vibes cute viral video prp

ताज्या बातम्या