स्वयंपाक करणे आजिबात सोपी गोष्ट नाही. स्वयंपाक करणे हे कौशल्य आहे पण ती आत्मसात करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पोळी-भाकरी करताना अनेकदा तव्याचे चटके सोसावे लागतात, भाजी चिरताना अनेकदा सुरीने सरकन बोटाला कापू शकते, तळण तळताना काही चुकले तर तेल उडू शकते…अशा एक ना अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर चांगला स्वयंपाक बनवता येतो. सुगरण होते हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पण सुगरण होण्यासाठी अशा समस्या टाळण्यासाठी किंवा हातळण्यासाठी अनेक छोट्या छोट्या ट्रिक किंवा उपाय वापरावे लागतात जे आपले कोणतेही अवघड काम झटक्यात सोपे करतात. अशाच एक ट्रिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एका हुशार सुनबाईने मिरची तळताना तेल उडू नये यासाठी भन्नाट जुगाड सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊ या भन्नाट जुगाड…

कोणतीही पदार्थ तेलात तळताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. तेल तापण्यासाठी सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवतात. एकदा ते तापले मगच त्यात कोणताही पदार्थ तळला जातो. तेलात पदार्थ टाकतानाही सावकाशपणे, तेलाच्या जवळ नेऊन कढईच्या बाजूने अलगद सोडावा लागतो नाहीतर अंगावर तेल उडून भाजू शकते. तसेच अनेकदा तेलात पाणी किंवा पाण्यात धुतलेले पदार्थ कोरडे करून घ्यावे लागतात नाहीतर तेल अंगावर उडू शकते. विशेषत: मिरची तळताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण मिरची गरम तेलात टाकली की ती फुटते आणि त्यामुळे तेल अंगावर उडते. त्यामुळे मिरची तळताना नेहमी मिरचीला मधोमध एक चिर देतात.

मिरची तळताना तेल अंगावर उडू नये म्हणून एका हुशार सुनबाईंनी भन्नाट उपाय शोधला आहे. व्हिडीओमध्ये महिला प्रथम तेल गरम करते, त्यानंतर एका झाऱ्यामध्ये ज्या मिरच्या तळायच्या आहेत त्या टाकते आणि त्याच्यावर एक छोटी ताटली ठेवून झाकते. त्यानंतर ताटलीसह झारा गरम तेलात टाकते आणि मिरची तळते. ताटलीमुळे मिरची तळताना तेल अंगावर उडत नाही. तेलातून झारा बाहेर काढून प्लेटसह उलटा करून ती त्यावर मीठ टाकते. इंस्टाग्रामवर sangita_kitchen3 या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prevent oil splashing when frying chillies viral video showes amzing trick snk