Viral Video : बांगडी हा असा अलंकार आहे ज्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.भारतात लहान मुलींपासून वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्व जण बांगड्या घालतात. स्त्रियांचा आवडीचा अलंकार म्हणून बांगड्या प्रसिद्ध आहे. बांगड्याचे एकापेक्षा एक नवनवीन प्रकार दिसून येतात. वेगवेगळ्या डिझाइनच्या बांगड्यांना स्त्रियांची अधिक पसंती मिळते. बांगड्यांची शोभा वाढवण्यासाठी बांगड्यांमध्ये खडे लावतात पण तु्म्हाला माहिती आहे का बांगड्यांमध्ये खडे कसे लावतात?
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बांगड्यांना खडे कसे लावतात, हे दाखवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की कोळसा पेटवून तवा गरम केला आहे आणि गरम तव्यावर खडे दिसत आहे. या व्हिडीओत एक महिला सुद्धा दिसत आहे. ती गरम तव्यावरी खडे एका रांगेत आणते आणि त्यावरुन बांगडी फिरवते. खडे गरम असल्यामुळे ते आपोआप बांगडीला चिकटतात. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बांगड्यांना खडे लावण्याची प्रक्रिया खरंच खूप क्रिएटिव्ह आहे.सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : “संस्कृती जपणारी शिवकन्या…” साडी नेसून बस चालवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला टॅलेंट म्हणतात” काही युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आपल्या देशात असे अनेक लोकं आहे ज्यांना विविध कला अवगत आहे. या कलेच्या मदतीने ते आपलं पोट भरतात पण त्यांचा कला गुणांना वाव मिळणेही तितकेच गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to put stones in bangles watch viral video of amazing skill in india ndj